IND vs BAN: सूर्यकुमार की शिवम? हिटमॅन रोहितचा रेकॉर्ड कोण ब्रेक करणार?
India vs Bangladesh T20i Runs : टीम इंडियाच्या 3 मुंबईकर फलंदाजांना माजी कर्णधार रोहित शर्मा याचा बांगलादेश विरूद्धच्या टी 20i मालिकेत रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. आता सूर्यकुमार, शिवम आणि यशस्वी या तिघांपैकी सर्वातआधी कोण रोहितला पछाडणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने लोळवल्यानंतर 3 सामन्यांच्या टी 20I सीरिजसाठी सज्ज आहे. टी 20I सीरिजसाठी टीम इंडिया आणि बांगलादेश दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. नजमुल हुसैन शांतो बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा रविवारी 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर येथे होणार आहे. या सामन्यात कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या जोडीला माजी कर्णधार रोहित शर्मा याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.
सूर्यकुमार आणि शिवम या दोघांकडे या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये रोहितचा भारताकडून 2024 या वर्षात टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. रोहितने भारताला टी 20I वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. तर सूर्या आणि शिवम ही मुंबईकर जोडी सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत.
रोहितने 2024 या वर्षात 11 टी 20I सामन्यांमध्ये 378 धावा केल्या आहेत. तर शिवमने 15 सामन्यांमधील 13 डावात 296 धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवने 150 च्या स्ट्राईक रेटने 11 मॅचमध्ये 291 रन्स केल्या आहेत. त्यामुळे शिवम दुबेला रोहितचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 83 तर सूर्याला 88 धावांची गरज आहे. तसेच या शर्यतीत यशस्वी जयस्वालही आहे. अशात रोहितचा विक्रम आधी सूर्या मोडीत काढणार की शिवम? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
2024 मध्ये सर्वाधिक टी 20I धावा करणारे भारतीय
- रोहित शर्मा – 378
- शिवम दुबे – 296
- यशस्वी जयस्वाल – 293
- सूर्यकुमार यादव – 291
- शुबमन गिल – 266
2024 मध्ये सर्वाधिक टी 20I धावा करणारे भारतीय
पहिला सामना, 6 ऑक्टोबर, ग्वाल्हेर
दुसरा सामना, 9 ऑक्टोबर, नवी दिल्ली
तिसरा सामना, 12 ऑक्टोबर, हैदराबाद
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.