IND vs BAN: हार्दिकचं अर्धशतक, कुलदीपच्या 3 विकेट्स, टीम इंडिया 50 धावांनी विजयी, बांगलादेशचं पॅकअप!
India vs Bangladesh Highlights In Marathi : टीम इंडियाने सुपर 8 फेरीतील एकूण आणि सलग दुसरा विजय मिळवला आहे.
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने सुपर 8 मधील सातव्या सामन्यात बांगलादेशवर 50 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशला 8 विकेट्स गमावून 146 धावाच करता आल्या. बांगलादेश विरूद्धच्या विजयासह टीम इंडियाने सेमी फायनलचा दावा आणखी मजबूत केला आहे. तर सलग दुसऱ्या पराभवानंतर बांगलादेशचा परतीचा प्रवास निश्चित झाला आहे.
बांगलादेशकडून कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तांझिद हसन याने 29 धावा केल्या. रिशाद होसैनने 24 धावा जोडल्या. लिटॉन दास आणि महमदुल्लाह या दोघांनी 13-13 धावा केल्या. शाकिब अल हसन 11 धावा करुन आऊट झाला. तर इतर फलंदाज टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर टिकलेही नाहीत. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर हार्दिक पंड्याने 1 विकेट घेतली.
टीम इंडियाची बॅटिंग
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने 27 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. विराट कोहलीने 37 धावा जोडल्या. ऋषभ पंतने 36 धावांची खेळी केली. शिवम दुबेने 34 रन्स केल्या. कॅप्टन रोहित शर्माने 23 धावांचं योगदान दिलं. सूर्यकुमार यादवने 6 धावा केल्या. तर अक्षर पटेल 3 धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून तांझिम हसन साकिब आणि रिझाद हौसे या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा विजयी पंच
𝘼 𝙘𝙡𝙞𝙣𝙞𝙘𝙖𝙡 𝙨𝙝𝙤𝙬 𝙞𝙣 𝘼𝙣𝙩𝙞𝙜𝙪𝙖 𝙛𝙧𝙤𝙢 #𝙏𝙚𝙖𝙢𝙄𝙣𝙙𝙞𝙖! 👏 👏
A 5⃣0⃣-run win over Bangladesh for @ImRo45 & Co as they seal their 2️⃣nd win on the bounce in Super Eight. 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/QZIdeg3h22 #T20WorldCup | #INDvBAN pic.twitter.com/GJ4eZzDUaA
— BCCI (@BCCI) June 22, 2024
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, शाकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेंदी हसन, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि आणि जसप्रीत बुमराह.