IND vs BAN: कॅप्टन रोहितचा विजयानंतर ऑस्ट्रेलियाला इशारा! म्हणाला पुढेही….
IND vs BAN: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत सलग पाचवा विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन रोहितने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे. जाणून घ्या हिटमॅन काय म्हणाला?
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाला आतापर्यंत 5 सामन्यात कुणीही पराभूत करु शकलेला नाही. टीम इंडियाने साखळी फेरीतील शानदार कामगिरी सुपर 8 फेरीतही कायम ठेवली आहे. साखळी फेरीत आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसएला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने अफगाणिस्तानला सुपर 8 मध्ये पराभूत केलं. त्यानंतर आता शनिवारी 22 जून रोजी बांगलादेशवर मात करत सेमी फायनलचा मार्ग मोकळा केला आहे. टीम इंडियाचा सुपर 8 मधील तिसरा आणि अखेरचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहितने ऑस्ट्रेलियाला रोखठोक इशारा दिला आहे.
टीम इंडियाने बांगलादेशला 50 धावांनी पराभूत केलं. उपकर्णधार हार्दिक पंड्या याने केलेल्या नाबाद 50 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 196 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 146 धावाच करता आल्या. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा नक्की काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
हिटमॅन काय म्हणाला?
“आमच्या सर्व फलंदाजांना त्यांची भूमिका माहिती आहे. तसेच ते त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये आमच्यासाठी अर्धशतक आणि शतकं इतक महत्त्वाचं नाही. तुम्ही प्रतिस्पर्ध्यावर किती दबाव तयार करता, हे महत्त्वाचं आहे. अशाचप्रकारे खेळू इच्छितो आणि हीच आमच्या खेळण्याची पद्धत राहणार आहे”, असं स्पष्ट शब्दात रोहितने म्हटलं.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा 24 जून रोजी होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. टीम इंडिया जिंकल्यास सेमी फायनलमध्ये ग्रुप 2 मधील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाविरुद्ध लढत होईल.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, शकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.