टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालकडे भविष्यातील मोठा खेळाडू म्हणून पाहिलं जातं. आगामी बांगलादेशविरूद्धच्या मलिकेसाठीही जयस्वाल याची निवड झालीये. कष्ट करून आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर यशस्वीने टीम इंडियामध्ये आपली जागा निर्माण केली आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याच्याकडे टीमचा मुख्य ओपनर म्हणून पाहिलं जातं. मात्र जयस्वाल क्रिकेटमुळे नाहीतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यशस्वी जयस्वालचा एका विदेशी तरूणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमधील तरूणी त्याची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे.
यशस्वी जयस्वाल याच्या कथित गर्लफ्रेंडचे नाव मैडी हैमिल्टन आहे. गेल्या तीन वर्षांपासून दोघे रिलेशनमध्ये असल्याची माहिती आहे. हैमिल्टन ही ब्रिटनची रहिवासी असून ती आता शिकत आहे. भारतामध्ये सामने असताना हैमिल्टन त्याला चीअर करण्यासाठी येते. आता मागे जानेवारीमध्ये झालेल्या भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीवेळी ती स्टँडमध्ये दिसली होती.
Yashasvi Jaiswal Spotted With His Girlfriend Maddie Hamilton 🥰😍 pic.twitter.com/Ub29v7PdXp
— ADITYA (@140OldTrafford) May 26, 2024
दोघांच्या रिलेशनबाबत आतापर्यंत कोणीही काही स्पष्टीकरण दिलेले नाही. दोघांचा एकमेकांसोबत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आयपीएल 2024 मध्ये मैडी हैमिल्टनअनेक सामन्यांमध्ये त्याला चीअर करताना दिसली होती. जयस्वाल आणि हैमिल्टन अनेकदा एकमेकांसोबत दिसले आहेत. मैडी हैमिल्टनचा भाऊ हेनरी हा यशस्वी जयस्वाल याचा चांगला मित्र आहे.
यशस्वी जयस्वाल याने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेमध्ये खोऱ्याने धावा काढल्या होत्या. पाच कसोटी सामन्यात 712 धावा त्याने केल्या होत्या. यामध्ये त्याने दोन द्विशतके ठोकली होतीत. यंदाच्या सीझनमध्ये आयपीएलमध्ये यशस्वीने 15 सामन्यांमध्ये 453 धावा केल्या होत्या. यशस्वीने कसोटी क्रिकेटमध्ये 9 सामन्यांमध्ये 16 डावांमध्ये 68.53 च्या सरासरीने 1028 धावा केल्या आहेत. 214 यशस्वीची वैयक्तिक धावसंख्या आहे.
बांगलादेशसोबत भारतीय संघाचे दोन कसोटी सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना 19 सप्टेंबर आणि दुसरा सामना 27 सप्टेंबरला पार पडणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून त्यामध्ये यशस्वी जयस्वाल याचाही समावेश आहे.