IND vs BAN : टीम इंडियाची बांगलादेशला दहशत, कसोटी मालिकेआधी कोच म्हणाला…
IND vs BAN Test Series : टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेआधी बांगलादेशच्या बॅटींग कोचने मोठे विधान केले आहे. नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.
टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. येत्या 19 सप्टेंबरपासून पहिला कसोटी सामना चेन्नईमधील चिदंबरम मैदानावर होणार आहे. पाहुणा बांगलादेश संघाने कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यासमोर प्लेइंग 11 निवडण्याचं मोठं आव्हान असणार आहे. या मालिकेआधी बांगलादेशचे बॅटींगचे कोच डेविड हेम्प यांनी मोठे विधान केले आहे.
भारतीय टीमला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूतक करणं काही सोपे नाही. आतापर्यंतची आकडेवारी पाहून तुम्हालाही अंदाज येईल. भारतीय संघामध्ये असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत त्यामुळे ही मालिका बांगलादेशसाठी मालिका अवघड असणार आहे. आमच्या खेळाडूंना त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असं डेविड हेम्प यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यावर आत्मविश्वास वाढला आहे. पाकिस्तानच्या कसोटी मालिकेमध्ये आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यावेळी आमचे पूर्ण खेळावरच होते, आम्हालासुद्धा माहिती आहे की, भारताविरूद्धची कसोटी मालिका सोपी नसणार आहे. मात्र आम्हाला स्वत:वर विश्वास ठेवून आमच्या खेळामधून भारतीय संघावर जास्तीत जास्त दबाव कसा टाकू शकतो हाच प्रयत्न करत असल्याचंही डेविड हेम्प म्हणाले.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाने कसोटी सामना खेळलेला नाही. तर पाकिस्तानविरूद्ध बांगलादेश संघाने विजय मिळवला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच भूमीत बांगलादेशने विजय मिळवला आहे. बीसीसीआयनेही पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये भारताच्या दिग्गज खेळाडूंनी कमबॅक केलं आहे.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ :- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.