IND vs BAN: बुमराह-शमीच्या अनुपस्थितीत या गोलंदाजाला संधी मिळणार! मोठी अपडेट समोर
India vs Bangladesh Test Series 2024: टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे दोघे नसल्याने एका गोलंदाजाचं पदार्पण होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून बांगलादेश विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची टी 20I मालिका होणार आहे. बांगलादेश टेस्ट आणि टी 20I सीरिजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. गौतम गंभीर यांची हेड कोच म्हणून ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. त्यात बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्यात घरात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे. अशात बांगलादेश विरूद्धच्या मालिकेत कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच गंभीर यांची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. तर मोहम्मद शमी हा न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेतून कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे. अशात 2 मुख्य गोलंदाजांशिवाय खेळणं हे भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे. या दोन्ही अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अर्शदीप सिंह याचं बांगलादेश विरुद्ध कसोटी पदार्पण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्शदीप बांगलादेश विरुद्ध टेस्ट डेब्यू करु शकतो. तसेच बुमराहला न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश विरुद्ध विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. मोहम्मद शमी याला वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर दुखापतीमुळे खेळता आलेलं नाही. त्यामुळे शमीही बांगलादेश विरुद्ध खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. अशात अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार या त्रिकुटावर टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाची जबाबदारी असणार आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई.
दुसरा सामना, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर.
बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संभावित संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंह.