आप्पाचा विषय लय हार्डय! विराट कोहली याने सरावादरम्यान फोडली भिंत, व्हिडीओ व्हायरल
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. बांगलादेशच्या मालिकेआधी विराटचा सराव करतानाचा व्हिडीओ समोर आलाय, सरावादरम्यान कोहलीने भिंत फोडली आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आता बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेमध्ये दिसणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईमधील चेपॉकवर होणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केलीये. टीम इंडिया सरावाला लागली असून जोरदार सराव करत आहे. या सरावादरम्यानचा विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटने आपल्या शॉटने ड्रेसिंग रूमची भिंत फोडली आहे.
विराट कोहलीने नेटमध्ये फलंदाजीचा जोरदार सराव केला. यादरम्यान कोहलीने एक असा शॉट मारला की ड्रेसिंग रूमची भिंत फोडली.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहली सामन्यातील मैदानावर उतरण्याआधी सरावावेळीच त्याने आपले तेवर दाखवले आहेत.
पाहा व्हिडीओ:-
Asteroid landed in Chepauk stadium#INDvsBAN #ViratKohli #ViratKohli𓃵 #Virat pic.twitter.com/IVxALXCWbd
— Jr.VK (@simhadri03) September 15, 2024
विराट कोहलीने 2024 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर, वैयक्तिक कारणांमुळे तो घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर राहिला. आता कोहली कसोटीत पुनरागमन करणार आहे. त्याच्यामुळे विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष लागलेलं आहे. या मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये आर अश्विन, आर जडेजासह अक्षरलाही टीममध्ये जागा मिळाली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीला सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडून तो आपल्या नावावर करण्याची संधी असेल. कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 591 डावांमध्ये 26942 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत तो 27 हजार धावांच्या आकड्यापासून केवळ 58 धावा दूर आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कोहलीने 58 धावा केल्या तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल. सचिनने 623 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
पहिल्या बांगलादेश कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर. अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.