IND vs BAN : विराटला आऊट दिल्यावर सामन्यात राडा, रोहितही भडकला, Video पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची?

Virat Kohli Not take a DRS : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पण व्हिडीओ पाहून चूक कोणाची हे तुम्हीच सांगा.

IND vs BAN : विराटला आऊट दिल्यावर सामन्यात राडा, रोहितही भडकला, Video पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची?
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 8:14 PM

टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला. टीम इंडियाचा पहिला डाव 376 धावांवर संपला. त्यानंतर बांगलादेशला अवघ्या 149 धावांवर ऑल आऊट करत टीम इंडियाने आघाडी घेतली. टीम इंडिया दुसऱ्यांदा बॅटींगला उतरली असून परत एकदा टॉप ऑर्डर फेल झाली. यामधील विराट कोहलीला आऊट होण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त ठरलाय. पण यामध्ये नेमकी चूक कोणाची? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा.

विराट कोहली पहिल्या कसोटीमध्ये अपयशी ठरला. पहिल्या डावामध्येही अवघ्या 06 धावा काढून तो परतला होता. त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये त्याच्याकडून सर्वांनाच अपेक्षा होत्या. मात्र पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाने 17 धावांवर त्याला माघारी परतावं लागलं. बांगलादेशचा मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर विराट ऑन साईडला फ्लिप करण्याच्या नादात पायचीत झाला. अंपायर रिचर्ड केटलबोरो यांनी त्याला आऊट दिले. त्यावेळी कोहली आणि शुबमन यांच्यात बोलणं झालं पण रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय दोघांनी घेतला. कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला.

विराट कोहली माघारी गेल्यावर जेव्हा रिव्ह्यूमध्ये पाहण्यात आले तेव्हा सत्य समोर आलं. कोहलीच्या पॅडला चेंडू लागण्याआधी त्याच्या बॅटला लागल्याचं स्पष्टपणे दिसलं. आता रिव्ह्यू घेण्यासाठी शुबमन गिल याने काही कॉल केला नाही. पण बॅटची कट लागली आहे की नाही हे खेळणाऱ्या फलंदाजाला लवकर समजतं. पण जगातील नंबर वन असलेला फलंदाज कोहली हा निर्णय घेण्याआधी गोंधळला आणि त्याने आपली विकेट गमावली. कदाचित कोहलीने वेळीच रिव्ह्यू घेतला असता तर मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला असता.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान, विराट कोहली दिग्गज खेळाडू असून त्याने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टीम इंडियाचा फलंदाजीचा कणा मानलं जातं. कोहलीने आतापर्यंत 114 कसोटी सामन्यांमध्ये 8871 धावा केल्या असून त्यामध्ये 29 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.

बांगलादेश प्लेइंग 11 : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.