विशाखापट्टणम | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना चौथ्याच दिवशी जिंकला आहे. टीम इंडियाने इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंड 292 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने या विजयासह पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली. तसेच 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या शेवटच्या 2 फलंदाजांचा अपवाद वगळता प्रत्येकाला सुरुवात मिळाली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी झॅक क्रॉली याचा अपवाद वगळता एकालाही अर्धशतकापर्यंत पोहचू दिलं नाही. इंग्लंडकडून झॅक क्रॉली याने सर्वाधिक 73 धावा केल्या. बेन फोक्स आणि टॉम हार्टली या दोघांनी प्रत्येकी 36-36 धावा केल्या.
बेन डकेट याने 28, जॉनी बेयरस्टो याने 26, रेहान अहमद आणि ओली पोप या दोघांनी प्रत्येकी 23-23 धावांचं योगदान दिलं. जो रुट याने 16 आणि कॅप्टन बेन स्टोक्स याने 10 धावा केल्या. जेम्स एंडरसन 5 धावांवर नाबाद राहिला. तर शोएब बशीर झिरोवर आऊट झाला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन या दोघांन 3-3 विकेट्स घेत्या. तर मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या तिघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
टीम इंडियाचं विजयी कमबॅक
CASTLED! ⚡️⚡️
Jasprit Bumrah wraps things up in Vizag as #TeamIndia win the 2nd Test and level the series 1⃣-1⃣#TeamIndia | #INDvENG | @Jaspritbumrah93 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/KHcIvhMGtD
— BCCI (@BCCI) February 5, 2024
दरम्यान 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएनशच्या स्टेडियममध्ये होणार आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.