IND vs ENG | अंपायरची इंग्लंडकडून ‘बॅटिंग’, टीम इंडियाला फटका!

India vs England 1st Test Day 3 | पहिल्या कसोटी सामन्यात पंचांनी इंग्लंडची बाजू मारत टीम इंडियाचं नुकसान केलंय. नक्की काय झालं? व्हीडिओत पाहा.

IND vs ENG | अंपायरची इंग्लंडकडून 'बॅटिंग', टीम इंडियाला फटका!
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 1:05 PM

हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडने केलेल्या 246 धावांच्या प्रत्युत्तरात ऑलआऊट 436 धावा करत 190 धावांची भक्कम आघाडी घेतली. टीम इंडियाकडून 5 विकेट्ससाठी अर्धशतकी भागीदारी करण्यात आली. तसेच तिघांनी 80 पेक्षा अधिक धावा केल्या. या तिघांनाही शतक करण्यात अपयश आलं. यशस्वी जयस्वाल 80, केएल राहुल 86 आणि रवींद्र जडेजा 87 धावांवर आऊट झाले.

यशस्वी आणि केएल या दोघांना इंग्लंडच्या गोलंदाजांनी शतकापासून रोखत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र रवींद्र जडेजाला रोखण्यासाठी इंग्लंडला अंपायरची मदत घ्यावी लागली, असं नेटकरी म्हणत आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट देण्याच्या निर्णयावरुन आता वादाला तोंड फुटताना दिसत आहे.

नक्की काय झालं?

जो रुट याने आपल्या बॉलिंगवर रवींद्र जडेजा एलबीडबल्यू आऊटची अपील केली. फिल्ड अंपायरने झटक्यात जडेजा आऊट असल्याचा निर्णय देण्यात आला. जडेजाने अंपायरच्या निर्णयाला आव्हान देत डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये एकाच वेळेस बॉल बॅट आणि पॅडला लागताना दिसतोय. थर्ड अंपायरने स्पष्टपणे पाहायचा प्रयत्न केला. मात्र बॉलने बॅटला आधी की पॅडला आधी स्पर्श केला हे थर्ड अंपायरलाही समजू शकलं नाही.

हे सुद्धा वाचा

अखेर थर्ड अंपायरने फिल्ड अंपायरच्या निर्णयासह जाण्याचं ठरवलं. अर्थात फिल्ड प्रमाणे थर्ड अंपायरनेही बॉल आधी पॅडला लागल्याचं मान्य केलं. अंपायर्स कॉलमुळे जडेजाला निर्णय मान्य करावा लागला आणि बाहेर जावं लागलं.

अंपायरच्या या ‘गेम’मध्ये रवींद्र जडेजाच्या खेळीचा गेमओव्हर झाला. परिणामी जडेजाची शतकाची संधी हुकली. जडेजाने टीम इंडियासाठी निर्णायक खेळी केली. जडेजाने 180 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.