IND vs ENG 1st Test | इंग्लंड 246 वर ऑलआऊट, बेन स्टोक्स याची 70 धावांची चिवट खेळी
India vs England 1st Test | इंग्लंडने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर शेवटच्या काही फलंदाजांनी कॅप्टन बेन स्टोक्स याच्यासह जोरदार धुलाई केली.
हैदराबाद | टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्याच दिवशी तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला 246 धावांवर ऑलआऊट केलं आहे. इंग्लंडचं टीम इंडियाने 64.3 ओव्हरमध्ये पॅकअप केलं. इंग्लंकडून कॅप्टन बेन स्टोक्स याने सर्वाधिक 70 धावांची खेळी केली. बेन स्टोक्सत याच्या 70 धावांच्या खेळीमुळे अडचणीत असलेल्या इंग्गलंडला 200 पार मजल मारता आली. स्टोक्स व्यतिरिक्त जॉनी बेयरस्टो याने 37 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीने सर्वाधिक प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडसाठी झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने 55 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे इंग्लंडची 7 बाद 155 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर इंग्लंडने पुढील 3 विकेट्ससाठी ऑलआऊट होईपर्यंत 91 धावा जोडल्या. टीम इंडियाकडे इंग्लंडला 200 आधी रोखण्याची संधी होती. पण कॅप्टन बेन स्टोक्स याने टीमला सावरलं.
स्टोक्सने सहकाऱ्यांसह फटकेबाजी करत टीमला 250 च्या जवळ पोहचवलं. स्टोक्स आणि बॅरिस्टो याच्या व्यतिरिक्त बेन डकेट याने 35, जो रुट याने 29, टॉम हार्टली याने 23, झॅक क्रॉली 20, रेहान अहमद 13 आणि मार्क वूड याने 11 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
जो रुटकडून सचिनचा रेकॉर्ड उध्वस्त
दरम्यान या पहिल्या डावादरम्यान काही रेकॉर्ड ब्रेक झाले. जो रुट 10 धावा करताच त्याने सचिन तेंडुलकर याला मागे टाकलं. जो रुट इंडिया-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर दुसऱ्या बाजूला अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या जोडीला मागे टाकून आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने टीम इंडियासाठी सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम केला.
इंग्लंड ऑलआऊट
The skipper top scores with 70 as we make 246 in our first innings 🏏
Match Centre: https://t.co/s4XwqqpNlL
🇮🇳 #INDvENG 🏴 #EnglandCricket pic.twitter.com/XjxVnNLagD
— England Cricket (@englandcricket) January 25, 2024
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.