IND vs ENG 1st Test | ओली पोपचा तडाखा, टीम इंडियाला 231 धावांचं आव्हान

India vs England 1st Test Day 4 | ओली पोप याच्या 2 वेळा कॅच सोडणं टीम इंडियाला चांगलंच महागात पडलं आहे. टीम इंडियाला या 2 चुका महागात पडतात की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

IND vs ENG 1st Test | ओली पोपचा तडाखा, टीम इंडियाला 231 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 12:05 PM

हैदराबाद | ओली पोप याच्या 196 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियाला सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 102.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 420 धावा केल्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 190 धावांची आघाडी होती. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 231 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाला गेल्या 10 वर्षांपासून भारतात 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान गाठता आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियाची या विजयी धावांचा पाठलाग करताना चांगलीच कसोटी लागणार असल्याचं चित्र आहे.

ओली पोप याने गेम फिरवला

टीम इंडियाने दिलेल्या 190 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची सावध सुरुवात झालेली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला झटके दिले. एका बाजूला इंग्लंडच्या मिडल ऑर्डरने टीम इंडियासमोर पाचारण केलं होतं, मात्र ओली पोप याने सावरलं. ओपनर झॅक क्रॉली 31 आणि बेन डकेट याने 47 धावा केल्या. तर मिडल ऑर्डरमध्ये जो रुट 2, जॉनी बेयरस्टो 10 आणि कॅप्टन बेन स्टोक्स 6 धावांवर आऊट झाले. त्यामुळे इंग्लंडची 5 बाद 163 अशी स्थिती झाली. मात्र ओली पोपने तिथून गेम बदलला

ओली पोपने सहाव्या विकेटसाठी शतकी, सातव्या आणि आठव्या विकेटसाठी सहकाऱ्यांसह अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं. ओली पोप आणि बेन फोक्स या जोडीने सहाव्या विकेटसाठी 112 धावा जोडल्या. रेहान खान याच्यासह ओली पोप याने सातव्या विकेटसाठी 64 रन्सची पार्टनरशीप केली. तर आठव्या विकेटसाठी टॉम हार्टली याने पोपला उत्तम साथ देत 80 धावा जोडल्या.

मात्र त्यानंतर इंग्लंडने अखेरच्या 2 विकेट्स या एकही धाव न करता गमावल्या. मार्क वूड डक झाला. तर इंग्लंडसाठी झुंज देणाऱ्या ओली पोप याला द्विशतक करण्यापासून जसप्रीत बुमराह याने रोखलं. बुमराहने ओलीला 196 धावांवर क्लिन बोल्ड केलं आणि इंग्लंडचा दुसरा डाव 420 धावांवर आटोपला.

टीम इंडियासमोर 231 धावांचं आव्हान

टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रवींद्र जडेजा याने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. तर अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.