IND vs ENG 1st Test | डेब्युटंट टॉम हार्टलीचा टीम इंडियाला दणका, इंग्लंड 28 धावांनी विजयी
India vs England 1st Test Match Highlights in Marathi | टीम इंडियाला 190 धावांची आघाडी घेऊनही इंग्लंड विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हैदराबाद | इंग्लंड क्रिकेट टीमने भारत दौऱ्याची विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 28 धावांनी थरारक विजय मिळवला आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र डेब्युटंट टॉम हार्टली याने 7 विके्टस घेत टीम इंडियाला 202 धावांवर ऑलआऊट केलं. इंग्लंडने अशाप्रकारे चौथ्याच दिवशी पहिला सामना जिंकला. इंग्लंडने या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात सावध सुरुवात केली. कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी 42 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर 12 व्या ओव्हरमध्येच टीम इंडियाने 2 विकेट्स गमावल्या. यशस्वी 15 आणि शुबमन गिल झिरोवर आऊट झाला. टॉम हार्टली यानेच या दोघांना मैदानाबाहेर पाठवलं. त्यानंतर इंग्लंडने टीम इंडियाला धक्क्यावर धक्के देत 69.2 ओव्हरमध्ये 202 धावांवर रोखलं.
टीम इंडियाकडून केएल राहुल याने 22 धावांचं योगदान दिलं. अक्षर पटेल 17 धावांवर आऊट झाला. श्रेयस अय्यर याने 13 धावाच केल्या. रवींद्र जडेजा घाईगडबडीत 2 वर रनआऊट झाला. त्यानंतर आर अश्विन आणि केएस भरत या दोघांनी 57 धावांची भागीदारी करत टीम इंडियाच्या विजयाचा आशा कायम ठेवल्या. मात्र टॉम हार्टली यानेच ही जोडी फोडली. टॉमने केएसला 28 धावांवर आऊट केलं. त्यानंतर आर अश्विनही 28 धावा करुन मागे गेला.
तर त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी शेवटच्या विकेटसाठी इंग्लंडला रडवलं. या दोघांनी अखेरपर्यंत सामना खेचला. त्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ हा 64 ओव्हरनंतर वाढवण्यात आला. मात्र अखेर टॉम हार्टली याने टीम इंडियाच्या डावातील अखेरच्या 70 व्या ओव्हरमध्ये दहावी विकेट घेत इंग्लंडला विजयी केलं. टॉम हार्टली याच्या 7 विकेट्स व्यतिरिक्त इंग्लंडकडून जो रुट आणि जॅक लीच या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
इंग्लंडची विजयी सलामी
A special spell from Tom Hartley leads England to an extraordinary win in the opening Test against India 👏#WTC25 | 📝 #INDvENG: https://t.co/E53vcqjfHE pic.twitter.com/qoJl3biFfu
— ICC (@ICC) January 28, 2024
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.