Rohit Sharma | हिटमॅन रोहितची निवृत्तीची वेळ ठरली! स्वत:नेच सांगितलं

Rohit Sharma Retirement | हिटमॅन रोहित शर्मा आता निवृत्तीच्या उंबठ्यावर आहे. अशात रोहितने टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान निवृत्तीबाबत रोखठोक उत्तर देत आपण केव्हा निवृत्त होणार याबाबत सांगितलंय.

Rohit Sharma | हिटमॅन रोहितची निवृत्तीची वेळ ठरली! स्वत:नेच सांगितलं
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 12:43 PM

हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये 5 मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकून बॅटिंगला आलेल्या इंग्लंडने बेझबॉल पद्धतीनेच बॅटिंग केली. सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. मात्र टीम इंडियाच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडला सुरुंग लावला. या दोघांनी अवघ्या 5 धावांच्या मोबदल्यात 3 धक्के देत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडने पहिल्या सत्रात लंच ब्रेकपर्यंत 3 विकेट्स गमावून 28 ओव्हरमध्ये 108 धावा केल्या.

या लंच ब्रेकदरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच त्याने अनेक मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली. दिनेश कार्तिक याने मैदानात घेतलेल्या या मुलाखतीत रोहितने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. तो काय बोलला हे जाणून घेऊयात. रोहित आता 36 वर्षांचा आहे. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे. यावर रोहितने बेधडक विधान केलं.

रोहित काय म्हणाला?

“जेव्हा मला वाटेल की मी खेळू शकत नाही. तेव्हा मी निवृत्ती घेईन. गेल्या काही वर्षात माझा खेळ सुधारला आहे”, असं रोहित स्पष्टपणे म्हणाला. तसेच रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 मधील अंतिम सामन्यातील पराभवाबाबतही प्रतिक्रिया दिली. “कोणतीही चॅम्पियनशीप गमावल्यनंतर दु:ख होतं”, असं रोहित म्हणाला.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाला गेल्यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभव ठरला. त्याआधी 2021 मध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला रोखत पहिल्याच झटक्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला होता.

रोहित शर्माच्या या मुलाखतीचा संपूर्ण व्हीडिओ हा काही वेळात जिओ सिनेमावर पाहायला मिळेल. या मुलाखतीत रोहितने अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. या मुलाखतीची प्रतिक्षा आता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.