मुंबई | अवघ्या काही दिवसांनी टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 आधी अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. टीम इंडिया विरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड भारत दौऱ्यावर आली आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडसाठी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 साखळीच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाी मालिका आहे.
मालिकेतील पहिला सामना हा 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांतील प्रत्येकी 1-1 खेळाडूने माघार घेतली आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रूक याने वैयक्तिक कारणामुळे मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी डॅन लॉरेन्स याला संधी दिली आहे. तर विराट कोहली यानेही वैयक्तिक कारणामुळे पहिल्या 2 सामन्यातून माघार घेतली आहे. विराटच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.
या दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन जाहीर झाली आहे. या टीममध्ये विराट कोहली याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कॅप्टन रोहित शर्मा याच्यासह यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांपैकी कुणीही एक ओपनिंग करु शकतो. मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर आणि केएस भरत या दोघांवर जबाबदारी असू शकते.
ऑलराउंडर म्हणून अक्षर पटेल आणि आर अश्विन या दोघांना संधी दिली जाऊ शकते. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांचा समावेश केला जाऊ शकतो.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत, अक्षर पटेल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि मोहम्मद सिराज.
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.