IND vs ENG | ओली पोप याचं चिवट शतक, इंग्लंडचं कमबॅक
Ollie Pope Century | टीम इंडिया विरुद्ध अडचणीत सापडलेल्या इंग्लंडचा डाव ओली पोप याने शतक करत सावरला. ओली पोप याच्या शतकी खेळीमुळे इंग्लंडला 100 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेता आली.
हैदराबाद | टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज ओली पोप याने चिवट शतक ठोकलंय. ओली पोप याने 154 चेंडूच्या मदतीने 10 चौकारांसह 64.94 च्या स्ट्राईक रेटने हे शतक झळकावलं. ओली पोप याचं हे 5 वं कसोटी शतक ठरलं. तसेच टीम इंडिया विरुद्धचं पहिलंवहिलं शतक ठरलं. ओली पोप याच्या शतकासह बॅकफुटवर गेलेल्या इंग्लंडने सामन्यात कमबॅक केलंय. तसेच ओली पोप याने शतकासह रेकॉर्डही केलाय.
ओली पोप 2018 नंतर दुसरा असा फलंदाज ठरलाय ज्याने टीम इंडिया विरुद्ध भारतात दुसऱ्या डावात शतक केलंय. ओली पोप याच्या आधी श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने याने हा कारमान केला होता. दिमुथने 2022 मध्ये बंगळुरुत झालेल्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं होतं.
ओली पोपने डाव सावरला
इंग्लंडने दुसऱ्या डावात ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे इंग्लंड पिछाडीवर पडली. इंग्लंडने बेन स्टोक्सच्या रुपात पाचवी विकेट गमावली. मात्र त्यानंतर ओली पोप याने बेन फोक्स याच्यासह सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत टीम इंडियाच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान इंग्लंडने पहिल्या डावात 246 धावा केल्या. या प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात रविंद्र जडेजा, केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या त्रिकुटाने केलेल्या 80+ धावांच्या जोरावर 436 धावा केल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे पहिल्या डावात 190 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर आता इंग्लंडने ओली पोप याच्या शतकाच्या जोरावर 100 धावांपेक्षा अधिक आघाडी घेतली आहे.
ओली पोप याने इंग्लंडला सावरलं
A remarkable hundred from Ollie Pope 🤩#WTC 25 | #INDvENG pic.twitter.com/KpXsweZNu7
— ICC (@ICC) January 27, 2024
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.