R Ashwin चा मोठा विक्रम, WTC इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
R Ashwin | आर अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या सत्रात मोठा धमाका केला आहे. अश्विन अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. अश्विन असा कोणता कारनामा केला आहे?
हैदराबाद | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्याच सत्रात आर अश्विन याने एका झटक्यात 2 विक्रम केले आहेत. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या दोघांना मागे टाकत टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारी जोडी ठरली. या दोघांच्या नावावर आता 502 विकेट्सची नोंद झाली आहे. आता अश्विन-जडेजा ही जोडी टीम इंडियाची सर्वात यशस्वी ठरली आहे. त्यानंतर अश्विन याने टीम इंडियाची अभिमानाने मान उंचावेल, असा कारनामा केला आहे.
आर अश्विन याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या इतिहासात 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे.अश्विन टीम इंडियासठी अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. तसेच अश्विन यासह 150 विकेट्स करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने अवघ्या 31 कसोटी सामन्यांमध्ये हा 150 विकेट्सचा आकडा गाठला आहे.
अश्विन याच्याआधी ही कामगिरी ऑस्ट्रेलियाच्याच दोघांनी केली आहे. यामध्ये कॅप्टन पॅट कमिन्स आणि नाथन लायन या दोघांचा समावेश आहे. पॅट कमिन्स आणि नाथन लायन या दोघांच्या नावावर अनुक्रमे 40 आणि 41 सामन्यांमध्ये प्रत्येकी 169 विकेट्सची नोंद आहे.
आर अश्विन ठरला पहिलाच भारतीय
Ravichandran Ashwin becomes the first Indian to complete 150 wickets in WTC history.
– An all time great. 🐐 pic.twitter.com/N5RFGvawJt
— Johns. (@CricCrazyJohns) January 25, 2024
500 विकेट्सच्या उंबरठ्यावर
दरम्यान आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात लंचपर्यंत 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे अश्विनच्या नावावर 492 विकेट्स झाल्या आहेत. त्यामुळे आता अश्विनला 500 चा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 8 विकेट्सची गरज आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.