IND vs ENG 1st Test : रोहितला वडापाव बोलण्याआधी एकदा हिटमॅनने घेतलेला कॅच पाहाच, Video व्हायरल
IND vs ENG 1st test | टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये हा सामना सुरू असून इंग्लंड संघ बॅकफूटला फेकला गेला आहे. या सामन्यात कॅप्टन रोहितने एक कमाल कॅच घेतला आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि टीम इंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पाहुण्या इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडियाच्या स्पिनर्सने इंग्लंडचं कंबरडं मोडलं. दुसरं सत्र संपण्याच्या आत इंग्लंडचा अर्धा संघ माघारी परतला आहे. टीम इंडियाच्या त्रिकुटासमोर इंग्लंडचे फलंदाच चाचपडलेले दिसले. आर अश्विन याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर रविंद्र जडेजाने दुसरी विकेट घेतली. या विकेटमध्ये रोहित शर्माचं योगदान जास्त आहे. कॅप्टन रोहितने एक कडक कॅच घेतला.
पाहा व्हिडीओ :-
Reflexes 🥵🥵
Vintage Rohit Sharma 🔥 🔥 #INDvsENG #INDvENG #RohitSharma𓃵pic.twitter.com/UL5ddYlGB2
— RoMan (@SkyXRohit1) January 25, 2024
इंग्लंकडून झॅक क्रॉली आणि बेन डकेट दोघे सलामीला आले होते. दोघांनीही दमदार सुरूवात केलेली. अर्धशतकी भागीदारी झाली त्यामुळे इंग्लंड मोठी धावसंख्या उभारणार असं वाटू लागलं होतं. मात्र अश्विन आणि जडेजा दोघांनी टीम इंडियाला कमबॅक करून दिलं. अश्विन याने 55 धावांवर बेन डकेट याला 20 धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर तिसऱ्याच ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ओली पोप याला आऊट केलं.
सुरूवातीपासूनच ओली पोपवर दबाव निर्माण केला होता. अश्विननेही एक टाईट ओव्हर केली. त्यानंतर जडेजाच्या ओव्हरमध्ये ओली पोप याच्या बॅटला कट लागून स्लीपमध्ये असलेल्या रोहितकडे बॉल गेला. बॉल थोडा रोहितच्या समोर पडला होता. त्यामुळे कॅच होतो की नाही असं वाटत होतं मात्र रोहितने कमाल कॅच घेतला.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.