IND vs ENG | दुसऱ्या कसोटीत शतक ठोकण्यात ‘यशस्वी’, जयस्वालची खणखणीत खेळी
Yashasvi Jaiswal Century | यशस्वी जयस्वाल पहिल्या सामन्यात शतकापासून वंचित राहिला होता. मात्र यशस्वीने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं आहे.
विशाखापट्टणम | यशस्वी जयस्वाल याला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक ठोकण्यात अपयश आलं होतं. यशस्वी पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 80 धावांवर आऊट झाला होता. यशस्वीचं शतक फक्त 20 धावांसाठी अधुरं राहिलं होतं. मात्र दुसऱ्याच सामन्यात यशस्वीने चूक सुधारली आहे. जयस्वालला दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्यात यश मिळालं आहे.
यशस्वीने इंग्लंड विरुद्ध खणखणीत सिक्ससह शतक पूर्ण केलं आहे. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं आहे. यशस्वीला अर्धशतकापासून ते शतकापर्यंत पोहचण्यासाठी 62 चेंडूचा सामना करावा लागला. यशस्वीने 89 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वीने त्यानंतर पुढील 49 धावा 62 चेंडूच्या मदतीने केल्या. यशस्वीने अशाप्रकारे 151 बॉलमध्ये 3 षटकार आणि 11 चौकारांसह 66.23 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं.
डाव सावरला
यशस्वीने शतकासह टीम इंडियाची एक बाजू लावून धरली. टीम इंडियाने पहिल्या 2 विकेट्स ठराविक अंतराने गमावल्या. रोहित शर्मा टीम इंडियाचा स्कोअर 40 असताना 14 धावांवर आऊट झाला. तर शुबमन गिल टीम इंडियाच्या 89 धावा असताना 34 रन्सवर आऊट झाला. टीम इंडिया अडचणीत असताना यशस्वीने एक बाजू लावून धरली. यशस्वीने श्रेयस अय्यर याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली.
दुसऱ्या सामन्यातून दोघांचं पदार्पण
दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यातून दोन्ही संघांकडून 1-1 खेळाडूने पदार्पण केलं आहे. टीम इंडियाकडून रजत पाटीदार याने डेब्यू केलं आहे. रजतचा विराट कोहली याच्या अनुपस्थितीत पहिल्या 2 सामन्यांसाठी समावेश करण्यात आला आहे. तर इंग्लंडमध्ये 20 वर्षीय बशीर अहमद याला संधी देण्यात आली आहे. बशीर इंग्लंडसाठी डेब्यू करणारा 713 वा खेळाडू ठरलाय. तर रजत पाटीदार हा 310 वा भारतीय ठरला आहे.
यशस्वी शतक
💯@ybj_19 breaches the three figure mark and brings up his second Test century with a maximum 👏👏
Live – https://t.co/X85JZGt0EV #INDvENG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/pZCqnhUu78
— BCCI (@BCCI) February 2, 2024
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (डब्ल्यू), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.