IND vs ENG 2nd Test | 6, 4 यशस्वी जयस्वाल याचं सेहवाग स्टाईल द्विशतक

Yashasvi Jaiswal Double Century | यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पहिलंवहिलं द्विशतक ठोकलंय.

IND vs ENG 2nd Test | 6, 4 यशस्वी जयस्वाल याचं सेहवाग स्टाईल द्विशतक
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 10:41 AM

विशाखापट्टणम | यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी कसोटी कारकीर्दीतील पहिलंवहिलं द्विशतक झळकावलं आहे. यशस्वीने बशीर अहमद याच्या बॉलिंगवर सामन्यातील 102 व्या ओव्हरमध्ये सिक्स आणि त्यानंतर चौकार ठोकत द्विशतक पूर्ण केलं. यशस्वीने 277 चेंडूंमध्ये 18 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 72.56 च्या स्ट्राईक रेटने द्विशतक झळकावलं. यशस्वी टीम इंडियासाठी द्विशतक करणारा एकूण 25 वा भारतीय ठरला आहे. तसेच यशस्वी द्विशतक ठोकणारा तिसरा युवा भारतीय ठरलाय.

असं झळकावलं द्विशतक

यशस्वीने टीम इंडियासाठी सुरुवातीपासून संयमी आणि संधी मिळेल तेव्हा आक्रमक बॅटिंग केली. एका बाजूला टीम इंडिया ठराविक अंतराने विकेट टाकत होती. तर दुसऱ्या बाजूला यशस्वी एकटा खिंड लढवत होता. यशस्वी सिंगल-डबल घेत आणि चौकार षटकार धावा जोडत गेला. यशस्वीने 89 बॉलमध्ये अर्धशतक, 151 बॉलमध्ये शतक, 224 बॉलमध्ये 150 आणि 277 बॉलमध्ये द्विशतकाचा टप्पा पार केला.

द्विशतक करणाचा तिसरा युवा भारतीय

यशस्वीने द्विशतकासह आणखी एक बहुमान मिळवला आहे. यशस्वी कमी वयात द्विशतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीने वयाच्या 22 वर्ष 37 व्या दिवशी ही कामगिरी केली आहे. तर विनोद कांबळी याने टीम इंडियासाठी कमी वयात द्विशतक केलं होतं. कांबळीने वयाच्या 21 वर्ष 35 व्या दिवशी 1993 साली इंग्लंड विरुद्धच मुंबईत डबल सेंच्युरी केली होती. तर त्यानंतर 20 दिवसांनी पुन्हा इंग्लंड विरुद्ध कांबळीने पुन्हा द्विशतक केलं होतं. सुनील गावसकर यांनी विंडिज विरुद्ध 1971 साली वयाच्या 21 वर्ष 283 व्या दिवशी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये विंडिज विरुद्ध हा कारनामा केला होता.

यशस्वीचं खणखणीत द्विशतक

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.