विशाखापट्टणम | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडने विजयासाठी मिळालेल्या 399 धावांचा पाठलाग करताना 14 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत. झॅक क्रॉली याने 29 आणि रेहान अहमद याने नाबाद 8 धावा केल्या आहेत. तर इंग्लंडने बेन डकेट याची एकमेव विकेट गमावली. आर अश्विन याने डकेटला 28 धावांवर विकेटकीपर केएस भरत याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे आता चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी 332 धावा कराव्या लागणार आहेत. तर टीम इंडियाला या मालिकेतील पहिल्या विजयासाठी आणखी 9 विकेट्सची गरज आहे.
त्याआधी टीम इंडियाकडे पहिल्या डावातील 143 धावांची आघाडी होती. तसेच दुसऱ्या डावात टीम इंडियाने शुबमन गिल याने शतक ठोकलं. मात्र शुबमन व्यतिरिक्त एकालाही मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला गुंडाळलं. टीम इंडियाचा दुसरा डाव हा 254 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून टॉम हार्टली याने 4 विकेट्स घेतल्या. रेहान अहमदने तिघांना मैदानाबाहेर पाठवलं. जेम्स एंडरसन याने 2 विकेट्स घेतल्या. तर शोएब बशीर याच्या खात्यात 1 विकेट गेली.
दरम्यान इंग्लंडला टीम इंडियाच्या 396 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात 253 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला 143 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने 6 विकेट्स घेत कसोटीत 150 बळींचा टप्पा गाठला. तर कुलदीप यादव याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याच्या खात्यात 1 विकेट गेली.
दुसऱ्या कसोटीतील चौथा दिवस रंगतदार ठरणार
Stumps on Day 3 in Vizag 🏟️
England 67/1 in the second-innings, need 332 more to win.
An eventful Day 4 awaits 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nbocQX36hB
— BCCI (@BCCI) February 4, 2024
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.