IND vs ENG | जेम्स एंडरसनचा शुबमन गिल याला भर मैदानात ‘पंच’

James Anderson and Shubman Gill | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. तर इंग्लंडच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये जेम्स एंडरसनची एन्ट्री झाली आहे.

IND vs ENG | जेम्स एंडरसनचा शुबमन गिल याला भर मैदानात 'पंच'
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 1:12 PM

विशाखापट्टणम | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात 2 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात समाधानकारक कामगिरी केल्याने पहिलं सत्र हे दोघांच्या नावावर राहिलं. पहिल्या सत्रात टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांच्या विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा 14 आणि शुबमन गिल 34 धावा करुन आऊट झाला.

इंग्लंडच्या 20 वर्षीय डेब्युटंट बशीर अहमद याने रोहित शर्माला आऊट करत पहिलीवहिली विकेट घेतली. बशीरने रोहितला ओली पोप याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यातून इंग्लंडसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कमबॅक करणाऱ्या अनुभवी जेम्स एंडरसन याने शुबमन गिलला जोरदार ‘पंच’ दिला.

नक्की काय झालं?

जेम्स एंडरसन याने शुबमन गिल याला 34 धावांवर विकेटकीपर बेन फोक्स याच्या हाती कॅच आऊट केलं. एंडरसनची शुबमनला कसोटी क्रिकेटमध्ये आऊट करण्याची ही पाचवी वेळ ठरली. एंडरसनने अशाप्रकारे शुबमनला ‘पंच’ दिला. जेम्सने शुबमन व्यतिरिक्त टीम इंडियाच्या दोघांची 5 पेक्षा जास्त वेळा शिकार केली आहे. जेम्सने सचिन तेंडुलकर याला 9 आणि विराट कोहली याला 7 वेळा आऊट करण्याची कामगिरी केली आहे.

हे सुद्धा वाचा

यशस्वीचं सलग दुसरं अर्धशतक

दरम्यान यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात सलग दुसरं अर्धशतक ठोकलं आहे. यशस्वीने हैदराबादमध्येही अर्धशतक ठोकलं होतं. यशस्वीच्या या चिवट खेळीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या सत्रात 100 पार मजल मारता आली. आता यशस्वी या अर्धशतकाचं रुपांतर शतकात करतो की नाही, याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (डब्ल्यू), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.