Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd Test Live Streaming | इंडिया-इंग्लंड दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे?

India vs England 2nd Test Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहे. हा सामना कधी होणार आहे? जाणून घ्या सर्वकाही.

IND vs ENG 2nd Test Live Streaming | इंडिया-इंग्लंड दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे?
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 4:57 PM

मुंबई | टीम इंडियाला सलामीच्या कसोटी सामन्यात मजबूत स्थिती असूनही पाहुण्या इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने टीम इंडियाला हैदराबादमध्ये चितपट करुन 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा सामन्यासाठी इंग्लंड टीम सज्ज आहे. इंग्लंडचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडिया पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहे. हा दुसरा सामना कधी होणार? कुठे होणार? सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना हा 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार. तर 9 वाजता टॉस होईल.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना हा डॉ वाय एस राजशेखर रेड्डी एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना हा टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपद्वारे पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर),रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स एंडरसन.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.