मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ वाय एस राजशेखर रेड्डी एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडिममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. इंग्लंड टीम विजयी घोडदौड कायम ठेवत मालिकेत 2-0 ने आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तर टीम इंडिया कमबॅकच्या तयारीने मैदानात उतरेल. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाची या स्टेडियममध्ये कसोटी क्रिकेटमधील कामगिरी कशी राहिली आहे, हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने आतापर्यंत विशाखापट्टणममध्ये एकूण 2 सामने खेळले आहहेत. टीम इंडियाने या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.टीम इंडियाने 2016 साली या मैदानातील आपला पहिलाच कसोटी सामना हा इंग्लंड विरुद्ध खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 264 धावांनी धमाकेदार विजय मिळवला होता. तर दुसरा कसोटी सामना हा दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2019 मध्ये खेळला होता. टीम इंडियाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 203 धावांनी धुव्वा उडवला होता. टीम इंडियाने हे दोन्ही सामने विराटच्या नेतृत्वात खेळले होते.
रोहित शर्मा याने विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितने विशाखापट्टणममध्ये खेळलेल्या एकमेव सामन्यात 303 धावा केल्या आहेत. रोहितने दक्षिण आफ्रिके विरुद्ध दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. रोहितने पहिल्या आणि दुसखऱ्या डावात अनुक्रमे 176 आणि 127 धावा केल्या होत्या. रोहितनंतर विराटच्या नावावर 2 सामन्यांमधील 4 डावात या मैदानात 1 शतकासह 299 धावा आहेत.
तर आर अश्विन याने 2 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत.अश्विनने 2016 मध्ये एका सामन्यात पंजा खोलत एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. तर 2019 मध्ये अश्विनने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 8 विकेट्स घेतल्या होत्या. अश्विनची या मैदानात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 7 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे टीम इंडियाची या मैदानातील कामगिरी आणि आकडेवारी ही इंग्लंडसाठी धडकी भरवणारी आहे.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.
दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.