IND vs ENG | शुबमन गिलचा फ्लॉप शो, रवी शास्त्री यांच्याकडून थेट कानउघडणी
Shubman Gill | शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. मात्र शुबमनला गेल्या काही सामन्यांपासून धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. वारंवार फ्लॉप ठरत असल्याने त्याला रवी शास्त्री यांनी चांगलंच सुनावलंय.
विशाखापट्टणम | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ऑल आऊट 396 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल याच्या 209 धावांच्या जोरावर टीम इंडियाला 390 पार मजल मारता आली. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर यशस्वी व्यतिरिक्त टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. काहींना योग्य सुरुवात मिळाली, मात्र त्यांना मोठी खेळीत त्याचं रुपांतर करता आलं नाही. त्यापैकी एक म्हणजे शुबमन गिल. पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतर शुबमनने 34 धावा केल्या. मात्र त्यानंतरही क्रिकेट चाहत्यांचा रोष त्याला सहन करावा लागला आहे. शुबमन गिल संधी मिळूनही फ्लॉप ठरत असल्याने त्याला टीममधून बाहेर बसवण्याची मागणी होत आहे. अशात टीम इंडियाची माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केलाय. तसेच शुबमनची कानउघडणी करत त्याला चेतेश्वर पुजारा कमबॅकच्या प्रतिक्षेत असल्याची आठवण करुन दिली.
रवी शास्त्री काय म्हणाले?
जेम्स एंडरसन याने शुबमन गिल याला बेन फोक्स याच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमनने 5 चौकारांच्या मदतीने 46 बॉलमध्ये 34 धावा केल्या. त्यानंतर शास्त्री यांनी गिलची कानउघडणी केली. “ही एक नवी आणि युवा टीम आहे. या युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करावं लागेल. हे विसरु नका की चेतेश्वर पुजारा संधीच्या प्रतिक्षेत आहे. तो रणजी ट्रॉफीत पुजारा मेहनत करतोय”, असं शास्त्री कॉमेंट्री दरम्यान म्हणाले. चेतेश्वर पुजारा रणजी ट्रॉफी स्पर्धेत सौराष्ट्रचं प्रतिनिधित्व करतोय.
चेतेश्वर पुजाराची कामगिरी
चेतेश्वर पुजारा याने यंदा रणजी ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत 7 डावांमधअये 538 धावा केल्या आहेत. यासह पुजाराने इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 3 सामन्यांसाठी टीम इंडियात दावा आणखी मजबूत केला आहे. बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेसाठी आधी फक्त 2 मॅचसाठी स्क्वाड जाहीर केला आहे. बीसीसीआय लवकरच उर्वरित 3 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करणार आहे.
तर शुबमन गिल हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध गेल्या वर्षी 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलपासून फ्लॉप ठरतोय. शुबमन गिल याला गेल्या 12 डावात एकही अर्धशतक करता आलेलं नाही. शुबमनने गेल्या 12 डावात अनुक्रमे 13, 18, 6, 10, 29*, 2, 26,36,10,23,0 आणि 34 अशा धावा केल्या.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.