मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाहुण्यांनी विजयी सलामी दिली. त्यानंतर आता उभयसंघात 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान दुसरा सामना होणार आहे. हा दुसरा सामना विशाखापट्टणममधील डॉ वाय एस राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. तर बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंड खेळेल. टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरेल. कॅप्टन रोहित शर्माला या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
रोहित शर्मा याने कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही प्रकारात एकूण 468 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रोहितने यापैकी टीम इंडियाच्या 295 सामन्यातील विजयामध्ये खेळाडू म्हणून सहभागी होता . तर रोहित इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकताच महेंद्रसिंह धोनीला मागे टाकेल. धोनीने टीम इंडियाचं 535 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. यापैकी धोनीला खेळाडू म्हणून 295 सामन्यात जिंकता आलंय.
दरम्यान टीम इंडियासाठी खेळताना सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हा विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. विराट कोहली याने टीम इंडियाचे सर्वाधिक 313 विजय साजरे केले आहेत. तर दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे. सचिन टीम इंडियाच्या 300 विजयांमध्ये खेळाडू म्हणून सहभागी होता. अशात आता रोहितलाही विजयाचं त्रिशतक पूर्ण करण्यासाठी 5 विजयांची गरज आहे.
विराट कोहली – 313 विजय
सचिन तेंडुलकर – 307 विजय
रोहित शर्मा – 295 विजय
महेंद्रसिंह धोनी – 295 विजय
युवराज सिंह – 227 विजय
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.