IND vs ENG 2nd Test : मानलं भावा तुला! रोहित प्रामाणिकपणे बोलला, हे दोन खेळाडू विजयाचे खरे शिल्पकार

IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने सामना संपल्यानंतर बोलताना दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाचे शिल्पकार ठरलेल्या खेळाडूंची नावं घेतली आहेत. कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

IND vs ENG 2nd Test : मानलं भावा तुला! रोहित प्रामाणिकपणे बोलला, हे दोन खेळाडू विजयाचे खरे शिल्पकार
IND vs ENG Second Test Rohit Sharma
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 5:35 PM

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना रोहित अँड कंपनीने 106 धावांनी विजय मिळवला आहे. दुसऱ्या सामन्याचे शिल्पकार दोन खेळाडू ठरले. जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वाल यांनी केलेल्या चमकदार कामगिरीने सहज विजय मिळवता आला. दुसरा कसोटी सामना जिंकत टीम इंडियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या विजयानंतर बोलताना कॅप्टन रोहित शर्माने दोन खेळाडूंचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

जसप्रीत बुमराह आमच्यासाठी चॅम्पियन खेळाडू आहे. जेव्हा अशी मॅच जिंकतो तेव्हा सर्व कामगिरीवर लक्ष द्यावं लागतं. आम्ही बॅटींग चांगली केलेली पण असा सामना जिंकणं कठीण असतं. आम्हाला वाटत होतं की गोलंदाजांनी आता चमकदार कामगिरी करून दाखवावी. त्यांनीही तशाच प्रकारे खेळ केला. बुमराहला गेम चांगला समजतो त्याला आणखी बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. संघाला देण्यासारखं त्याच्याकडे खूप काही असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

विकेट फलंदाजीसाठी चांगलं होतं, अनेक फलंदाजांनी दमदार सुरूवात केली होती पण त्यांना मोठी धावसंख्या गाठता आली नाही. समजू शकतो को काही खेळाडू आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढवणं महत्त्वाचं आहे. युवा संघाला सोबत घेऊन इंग्लंडसारख्या संघाचा सामना करणं ही अभिमानाची गोष्ट आहे. संघातील अनेक खेळाडू हे कसोटी क्रिकेट जास्त प्रमाणात खेळले नाहीत. हा फॉरमॅट समजून घेण्यासाठी त्यांना वेळ लागेल. त्यांनी कोणताही दबाव न घेता खेळावं असं मला वाटत असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 396 धावा केलेल्या होत्या. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांच्या आतमध्ये संपला. जसप्रीत बुमराह याने सहा विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 255 धावांवर संपला. पहिल्या डावातील आघाडीमुळे इंग्लंड संघाला 399 धावा करायच्या होत्या. मात्र चौथ्या दिवशी इंग्लंड संघाला 292 धावांवर गुंडाळत टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.