Sarfaraz Khan | टीम इंडियात पहिल्यांदाच निवड, सरफराजची पहिली प्रतिक्रिया काय?

Sarfaraz Khan 1st Reaction Team India | अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दुल ठाकुर, यशस्वी जयस्वाल याच्यानंतर आता टीम इंडियात मुंबईकर सरफराज खान याची एन्ट्री झाली आहे. सरफराज खानला इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संधी मिळाली आहे. त्यानंतर सरफराज खानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sarfaraz Khan | टीम इंडियात पहिल्यांदाच निवड, सरफराजची पहिली प्रतिक्रिया काय?
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 8:09 PM

मुंबई | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला दुहेरी झटका लागला आहे. टीम इंडियातून दुखापीतमुळे रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोघे दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडले आहेत. तर टीममध्ये दुसऱ्या सामन्यासाठी तिघांची निवड करण्यात आली आहे. या तिघांमध्ये ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि मुंबईकर सरफराज खान याचा समावेश आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबत क्रिकेट चाहत्यांना माहिली दिली आहे.

सरफराज खान हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. त्याला टीम इंडियात संधी देण्यात यावी, अशी मागणी ही गेल्या कित्येक महिन्यांपासून करण्यात येत होती. मात्र सरफराजला काय संधी मिळत नव्हती. मात्र अखेर सरफराजसाठी टीम इंडियाचे द्वार खुले करण्यात आले. सरफराजला दुसऱ्याच सामन्यासाठी का होईना, अखेर संधी तर मिळाली. बीसीसीआयच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून स्वागत केलं जात आहे. अशात आता सरफराजची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सरफराज खान याच्या इंस्टा स्टोरी

Sarfaraz khan Instagram Story

हे सुद्धा वाचा

सरफराजने टीम इंडियात निवड झाल्याच्या आनंदात इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. सरफराजने इंस्टावर अनेक स्टोरी शेअर केल्या आहेत. सूर्यकुमार यादव याने सरफराजचं अभिनंदन करत एक पोस्ट केलीय. ज्याचा फोटो सरफराजने स्टोरीतून शेअर केलाय. तसेच सरफराजने वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत ‘चक दे इंडिया’सिनेमातील ‘अब तो भाई चल पडी अपनी ये नाव है..’ या गाण्यासह स्टोरी शेअर केली आहे. तसेच तिसऱ्या स्टोरीत सरफराजने टीम इंडियातील खेळाडूंच्या नावासह स्वत:चा फोटो तिरंगा आणि हार्ट इमोजीसह शेअर केला आहे.

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.