IND vs ENG 2nd Test | टीम इंडियाच्या विजयानंतर मॅन ऑफ द मॅच कोण?
India vs England 2nd Test Match Potm | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वाल या तिघांची भूमिका निर्णायक ठरली. पण मॅन ऑफ द मॅच कोण?
विशाखापट्टणम | पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात दणक्यात कमबॅक केलं. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी 106 धावांनी इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन या दोघांच्या धारदार बॉलिंगसमोर इंग्लंडचा 399 धावांचा पाठलाग करताना 292 वर बाजार उठला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. बुमराहने या सामन्यात फिफरसह एकूण 9 विकेट्स घेतल्या.
तर यशस्वी जयस्वाल याने टीम इंडियासाठी पहिल्या डावात द्विशतकी खेळी केली. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं द्विशतक ठरलं. तर शुबमन गिल याने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. अशाप्रकारे यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल हे त्रिकुटांनी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मात्र मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार कुणा एकालाच मिळतो. हा पुरस्कार मिळाला जसप्रीत बुमराह याला.
बुमराहची कामगिरी
जसप्रीत बुमराह याने पहिल्या डावात 45 धावांच्या मोबदल्यात 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहची कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही 10 तर भारतातील दुसरी वेळ ठरली. तसेच बुमराहने कसोटीत 150 विकेट्सचा टप्पाही पार केला. तर बुमराहने दुसऱ्या डावात 46 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाची दुसऱ्या स्थानी झेप
दरम्यान टीम इंडियाने इंग्लंडवर विजय मिळवल्याने दुप्पट फायदा झाला आहे. टीम इंडियाने विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप 2023-2025 या साखळीत पॉइंट्स टेबलमध्ये 5 व्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅच
For his breathtaking bowling display and claiming 9⃣ wickets in the match, Vice-Captain @Jaspritbumrah93 is adjudged the Player of the Match 🙌
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/eTRxgMngNB
— BCCI (@BCCI) February 5, 2024
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.