Ind vs Eng : तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंना डच्चू?, मालिका विजयासाठी विराट सेनेची नवी रणनीती!
तिसऱ्या सामन्यात टीममधून क्रुणाल पांड्या आणि कुलदीप पांड्या आऊट होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. | Ind vs Eng 3rd ODI
पुणे : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना (India vs England 3rd ODI) रविवारी खेळला जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. तिसऱ्या वन डे मध्ये प्लेइंग 11 काय असेल, अशी चर्चा सुरु असताना तिसऱ्या सामन्यात टीममधून क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep yadav) आऊट होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Ind vs Eng 3rd ODI May Be kuldeep yadav And Krunal Pandya Out)
क्रुणाल आणि कुलदीप यांचा खराब परफॉर्मन्स
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या बोलर्सची खराब बोलिंग भारताच्या पराभवाला जबाबदार ठरली. भारतीय बॅट्समननी धावांचा डोंगर उभा करुन दिलेला असतानाही बोलर्सचा विशाल धावाही वाचवता आल्या नाही. फिरकीपटू कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने तर अक्षरश: धावांची खिरापत वाटली. क्रुणालने 6 ओव्हरमध्ये तब्बल 72 रन्स दिले. 12 हा त्याचा इकोनॉमी रेट होता. 72 धावांच्या बदल्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
दुसरीकडे कुलदीपनेही तोच कित्ता गिरवला. कुलदीपने 10 ओव्हर्समध्ये 84 रन्स दिले. त्यालाही 84 धावांच्या मोबदल्यात एकही विकेट्स मिळवता आली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी कुलदीपला जोरदार लक्ष्य केलं. त्याच्या बोलिंगवर एकूण आठ षटकार इंग्लिश फलंदाजांनी लगावले. हे एकदिवसीय सामन्यातील कोणत्याही भारतीय गोलंदाजाला मारलेले सर्वांत जास्त षटकार आहेत.
कुणाला संधी मिळणार?
कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते. युजवेंद्र चहल सध्या फॉर्ममध्ये नसला तरी कर्णधार कोहलीकडे दुसरा कोणताही पर्याय अद्यापतरी नाही.
टी नटराजनला संधी?
क्रुणाल पांड्या बॅटिंगच्या जोरावर टीममध्ये संघात जागा टिकवू शकतो परंतु त्याचा बोलिंग बोलिंग परफॉर्मन्स त्याला मारक ठरणार आहे. भारताचं प्रमुख अस्त्र भुवनेश्वरबरोबर यॉर्कर किंग टी नटराजनला संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शार्दुल ठाकूर सध्या फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याला जर आराम दिला तर मोहम्मद सिराजचाही समावेश होऊ शकतो.
(Ind vs Eng 3rd ODI May Be kuldeep yadav And Krunal Pandya Out)
हे ही वाचा :
Ind vs Eng : के.एल राहुल ‘शेर’ तर स्टोक्स-बेअरस्टो ‘सव्वाशेर’, टीम इंडियाच्या पराभवाचे दोन व्हिलन
नताशाचा रोमँटिक अंदाज, स्विमिंग पूलमध्ये हार्दिकला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर