IND vs ENG : इंग्लंडचं टीम इंडियासमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर इंग्लंडने 20 षटकात 9 गडी गमवून 171 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं आहे. आता कोण मारणार बाजी? याकडे लक्ष लागून आहे.

IND vs ENG : इंग्लंडचं टीम इंडियासमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 28, 2025 | 8:43 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून भारताने आधीच दबाव टाकला आहे. त्यात तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडने 20 षटकात 9 गडी गमवून 171 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. पण 190 धावांचं आव्हान इंग्लंडसाठी सुरक्षित असतं. पण टीम इंडियाने मागच्या सामन्यात 166 धावांचा पाठलाग केला आहे. त्यामुळे ही खेळपट्टी पाहता आणि भारतीय फलंदाजी आक्रमकपणा पाहता हा सामना जिंकणं सहज सोपं आहे. पण आता इंग्लंडचे गोलंदाज दव फॅक्टरमध्ये कधी गोलंदाजी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागू आहे.

खरं तर फिल सॉल्टची विकेट गेल्यानंतर बेन डकेट आणि जोस बटलर यांनी चांगला जम बसवला होता. बेन डकेटने एका बाजूने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली हती. 28 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर जोस बटलरने 22 चेंडूत 24 धावांची खेळी केली. वरुण चक्रवर्तीने जोस बटलरची विकेट काढली आणि इंग्लंडच्या खेळाची गती मंदावली. त्यानंतर लगेचच बेन डकेटची विकेट घेण्यात अक्षर पटेल याला यश आलं. त्यानंतर एकही फलंदाज हवा तसा तग धरू शकला नाही. जेमी स्मिथ 6 धावा करून बाद झाला. तर जेमी ओवरटनला खातंही खोलता आलं नाही. वरुण चक्रवर्तीचा विकेटचा पंच मारला. वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 24 धावा देत 5 गडी बाद केले आहेत.मोहम्मद शमी या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पाय ठेवला आहे. पण पहिला सामना काही खास गेला नाही. त्याने 3 षटकात 25 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतला नाही.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....