IND vs ENG : टीम इंडियाकडून 2 मोठ्या चुका, पराभवानंतर सोशल मीडियावर चर्चा
India vs England 3rd T20i : इंग्लंडने टीम इंडियावर राजकोटमध्ये विजय मिळवला. इंग्लंडने यासह मालिकेत विजयाचं खातं उघडलं. मात्र टीम इंडियाने कोणत्या 2 चुकांमुळे सामना गमावला? जाणून घ्या.
![IND vs ENG : टीम इंडियाकडून 2 मोठ्या चुका, पराभवानंतर सोशल मीडियावर चर्चा IND vs ENG : टीम इंडियाकडून 2 मोठ्या चुका, पराभवानंतर सोशल मीडियावर चर्चा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/axar-patel-ind-vs-eng-3rd-t20i.jpg?w=1280)
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा टी 20i सामना हा राजकोटमध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाचा या सामन्यात 26 धावांनी पराभव झाला. टीम इंडियाचा हा या मालिकेतील पहिलाच पराभव ठरला. इंग्लंडने या विजयासह मालकेतील आव्हान कायम ठेवलं. मात्र या पराभवानंतरही टीम इंडिया मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मात्र फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाला विजयी करण्यासाठी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. टीम इंडियाच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर युवा ब्रिगेडचं नक्की कुठे चुकलंय? यावर चर्चा सुरु झाली. नेटकऱ्यांनी टीम इंडियाच्या 2 चुका समोर आणल्या आहेत, ज्यामुळे पराभव केल्याचा दावा केला जात आहे.
नक्की कुठे चुकलं?
कर्णधार सूर्यकुमार यादव याचा बॅटिंगने फ्लॉप शो सुरुच आहे. सूर्याकडून तिसऱ्या सामन्यात स्फोटक खेळीची अपेक्षा होती. मात्र सूर्याने निराशा केली. सूर्या या सामन्यात तिलक वर्माआधी बॅटिंगसाठी आला. सूर्याने असं का केलं? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला. तिलक तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येतो. तिलकने दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या स्थानी खेळून रंगतदार सामन्यात टीम इंडियाला विजयी केलं होतं. तसेच तिलक नाबाद परतला. मात्र तिलकऐवजी सूर्याने तिसऱ्या स्थानी आल्याने क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं गेलं.
ध्रुव जुरेल याला आठव्या स्थानी बॅटिंगसाठी पाठवण्याचा निर्णय क्रिकेट चाहत्यांना पटला नाही. ध्रुव एक चांगला फलंदाज आहे. ध्रुव फारफार सहाव्या स्थानी फलंदाजी करतो. मात्र तिसऱ्या सामन्यात ध्रुवआधी वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे दोघे बॅटिंगसाठी आले. ध्रुवला या तिसऱ्या सामन्यात फक्त 2 धावाच करता आल्या. तर अक्षरने 15 आणि वॉशिंग्टनने 6 धावा जोडल्या.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: जोस बटलर (कर्णधार), फिलिप साल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.