IND vs ENG : या खेळाडूमुळे आमचा पराभव, कॅप्टन सूर्याने थेट नावच घेतलं
Suryakumar Yadav Post Match IND vs ENG 3rd T20I : टीम इंडियाला राजकोटमधील सामन्यात विजय मिळवून आणखी एक मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने तिसरा सामना जिंकून कमबॅक केलं. टीम इंडियाच्या या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने खेळाडूचं नाव घेत त्याला पराभवासाठी कारणीभूत ठरवलं आहे.
![IND vs ENG : या खेळाडूमुळे आमचा पराभव, कॅप्टन सूर्याने थेट नावच घेतलं IND vs ENG : या खेळाडूमुळे आमचा पराभव, कॅप्टन सूर्याने थेट नावच घेतलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/suryakumar-yadav-team-india-t20i-captain.jpg?w=1280)
इंग्लंडने मंगळवारी 28 जानेवारीला टीम इंडियाचा विजयी रथ रोखला. इंग्लंडने टी 20I मालिकेतील तिसऱ्या आणि करो या मरो सामन्यात टीम इंडियावर 26 धावांनी मात केली. इंग्लंडने या विजयासह मालिकेत विजयाचं खातं उघडलं. इंग्लंडने या विजयासह आव्हान कायम राखलं. इंग्लंड या विजयानंतर मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने तसं होऊ दिलं नाही. टीम इंडियाला विजयी करण्यासाठी मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी याने पूर्ण जोर लावला. वरुणने 5 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. मात्र फलंदाज आपल्या भूमिकेला न्याय देऊ शकले नाहीत. टीम इंडियाला 172 धावांचा पाठलाग करताना 145 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाच्या या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने प्रतिक्रिया दिली. सूर्याने टीम इंडियाच्या पराभवासाठी कारणीभूत असलेल्या खेळाडूचं नाव घेतलं.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
“दिवसअखेर थोडं फार दव होतं. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल दोघे बॅटिंग करत होत तेव्हा वाटलं की आम्ही जिंकू. मात्र आदिल रशीदला क्रेडिट द्यायला हवं. आदिलने अप्रतिम गोलंदाजी केली, त्यामुळेच तो वर्ल्ड क्लास बॉलर आहे. आदिलने आम्हाला स्ट्राईक रोटेट करुन दिली नाही. त्यामुळेच आम्ही गोटात इतके सारे स्पिनर्स ठेवले आहेत”, असं सूर्याने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं.
“प्रत्येक टी 20 सामन्यात आम्ही काहीतरी वेगळं शिकतो. बॅटिंगच्या हिशोबाने आम्ही अनेक गोष्टी आत्मसात केल्या. आम्ही सर्व काय चुकलं यावर चर्चा करु”, असंही सूर्याने स्पष्ट केलं.
शमी आणि वरुणबाबत म्हणाला…
सूर्याने मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्थी या दोघांबाबतही प्रतिक्रिया दिली. मोहम्मद शमी याने वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. मात्र शमीला जोरदार कमबॅक करता आलं नाही. सूर्याने यावरुन प्रतिक्रिया दिली. “शमी पुढे आणखी चांगलं करेल. शमी सराव सत्रात कसून मेहनत करतोय. शमी संतुलित गोलंदाज आहे आणि त्यामुळेच त्याला मैदानात यश मिळतंय. तो फार मेहनत करतो”, असंही सूर्याने सांगितलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: जोस बटलर (कर्णधार), फिलिप साल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.