IND vs ENG : वॉर्नरची कॉपी करणं यशस्वी जयस्वालला पडलं महागात! शतकी खेळीनंतर कंबरदुखीचा त्रास
इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीला यशस्वीच्या जैसबॉलने जोरदार प्रत्युत्तर दिलं. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली. शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 300 धावांचा पल्ला ओलांडला आहे. 122 चेंडूत शतक पूर्ण केलं पण रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतावं लागलं. एक चूक महागात पडल्याची चर्चा आहे.
मुंबई : राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची पिसं काढली होती. पण तिसऱ्या दिवशी बेझबॉल रणनिती सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. या धावांसह पुढे खेळताना टीम इंडियाने 300 पार धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या गड्यासाठी मोठी भागीदारी केली. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाला 322 धावांपर्यंत मजल मारता आली. पण शतक ठोकल्यानंतर सेलिब्रेशन चांगलंच महागात पडल्याचं दिसत आहे. कारण शतक ठोकताच यशस्वी जयस्वालने डेविड वॉर्नर स्टाईलने जोरदार उडी घेतली. यामुळे त्याची पाठ भरून आल्याचं पुढच्या 10 चेंडूत दिसून आलं. दुखापत जास्तच होत असल्याने रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतावं लागलं. फिजिओने जयस्वालच्या दुखापतीवर अजूनही अपडेट दिलेलं नाही.
यशस्वीने शतक ठोकताच आनंदात मोठी उडी मारली. त्यानंतर जमिनीवर येताना पाठीत चमक भरल्याचं वाटत आहे. त्यामुळे शतकी खेळीनंतर डाव अर्ध्यातच सोडावा लागला. जयस्वालने 122 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केलं. पण अजून धावसंख्येत भर घालता आली असती. आता यशस्वी जयस्वाल सकाळच्या सत्रात फलंदाजीला उतरतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चौथा दिवसाचा खेळ निर्णायक ठरणार आहे. 400 च्या पार धावा गेल्या तर विजय सोपा होईल.
A leap of joy to celebrate his second century of the series 🙌
Well played, Yashasvi Jaiswal 👏👏#TeamIndia | #INDvENG | @ybj_19 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pdlPhn5e3N
— BCCI (@BCCI) February 17, 2024
यशस्वी जयस्वालने सुरुवातीच्या 34 धावा 70 चेंडूत केल्या. त्यानंतर अर्धशतक पुढच्या 10 चेंडूत पूर्ण झाला. त्यानंतर जयस्वालने आक्रमक शैली आत्मसात केली आली तोडफोड सुरु केली. त्यामुळे शतक पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. यशस्वी जयस्वालने 133 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या.
यशस्वी जयस्वालने जुलै 2023 मध्ये कसोटीत पदार्पण केलं आहे. आपल्या कसोटी कारकिर्दितलं तिसरं शतक ठोकलं. तीन शतकं मागच्या 13 डावात केल्या आहेत. विशाखापट्टणम कसोटीत द्विशतक ठोकलं होतं. हैदराबाद कसोटीत जयस्वालने पहिल्या डावात 80 आणि दुसऱ्या डावात 15 धावा केल्या होत्या.