IND vs ENG | बेन डकेटची तोडफोड बॅटिंग, दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड 238 धावांनी पिछाडीवर
India vs England 3rd Test Day 2 Stumps Highlights In Marathi | राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमध्ये सुरु असलेल्या टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
राजकोट | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडने टीम इंडियाच्या 445 धावांच्या प्रत्युत्तरात 35 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 207 धावा केल्या आहेत. इंग्लंड अजूनही टीम इंडियाच्या तुलनेत 238 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडसाठी बेन डकेट याने जोरदार फटकेबाजी करत नाबाद शतक झळकावलं. डकेट 133 धावांवर नाबाद परतला. जो रुट हा 9 रन्सवर नॉट आऊट आहे. तर झॅक क्रॉली याने 15 आणि ओली पोपने 39 धावांचं योगदान दिलं. आता तिसऱ्या दिवशी टीम इंडियासमोर इंग्लंडला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाकडून पहिल्या डावात मोहम्मद सिराज आणि आर अश्विन या दोघांना 1-1 विकेट मिळाली. सिराजने ओली पोपला 39 धावांवर एलबीडब्ल्यू करत इंग्लंडला दुसरा झटका दिला. तर आर अश्विन याने झॅक क्रॉली याला 15 धावांवर रजत पाटीदार याच्या हाती कॅच आऊट केलं. अश्विन याच्यासह इतिहास रचला. अश्विन टीम इंडियाकडून कसोटीत 500 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.
टीम इंडियाचा पहिला डाव
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 445 धावा केल्या. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या दोघांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र दोघे झटपट आऊट झाले. कुलदीपने 4 आणि जडेजाने 112 धावा केल्या. त्यानंतर डेब्युटंट ध्रुव जुरेल आणि आर अश्विन दोघांनी 77 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर अश्विन 37 धावा करुन बाद झाला. तर ध्रुव जुरेल याने 46 धावांची निर्णायक खेळी केली. तर अखेरीस 26 धावांची स्फोटक खेळी केली. मोहम्मद सिराज 3 धावांवर नाबाद परतला.
त्याआधी पहिल्या दिवशी टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याच्या 131 धावांच्या जोरावर 360 धावांपर्यंत मजल मारली. मात्र मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी घोर निराशा केली. इंग्लंडकडून पहिल्या डावात मार्क वूड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रेहान अहमद याच्या खात्यात 2 विकेट्स गेल्या. तर जेम्स एंडरसन, टॉम हार्टली आणि जो रुट या तिघांना 1-1 विकेट मिळाली.
इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी जोरदार पलटवार
That’s Stumps on Day 2 in Rajkot!
England move to 207/2, trail by 238 runs.
Scorecard ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qZgkVvcNg7
— BCCI (@BCCI) February 16, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.