IND vs ENG | इंग्लंड विरुद्ध 322 धावांची भक्कम आघाडी, तिसरा दिवस टीम इंडियाचाच
India vs England 3rd Test Day 3 Highlights In Marathi | टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पूर्णपणे आपली छाप सोडली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनंतर भारतीय फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली.
राजकोट | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसरा दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिला आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 51 ओव्हरमध्ये 196 धावा केल्या. तसेच टीम इंडियाकडे पहिल्या डावातील 126 धावांची आघाडी होती. त्यामुळे टीम इंडियाकडे आता 322 धावांची भक्कम आघाडी झाली आहे. तिसऱ्या दिवशी कुलदीप यादव 3* आणि शुबमन गिल 65 धावांवर नाबाद परतले. तर रजत पाटीदार याला भोपळाही फोडता आला नाही. यशस्वी जयस्वाल 104 धावांवर रिटारर्ड हर्ट झाला. तर कॅप्टन रोहित शर्मा 19 धावांवर माघारी परतला. इंग्लंडकडून जो रुट आणि टॉम हार्टली या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
इंग्लंडचा पहिला डाव
त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात टीम इंडियाच्या 445 च्या प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसअखेर बेन डकेट याच्या नाबाद शतकाच्या जोरावर 35 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 207 धावा केल्या. इंग्लंड 238 धावांनी पिछाडी होती. तिसऱ्या दिवशी हार्टली आणि जो रुट ही जोडी मैदानात आली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल केली. टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी 112 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडला 319 धावांवर ऑलआऊट करत 126 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून एकट्या बेन डकेट याने सर्वाधिक 153 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या. तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
त्याआधी टीम इंडियाने पहिल्या डावात कॅप्टन रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर 445 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडियाकडून रोहितने सर्वाधिक 131 धावांची खेळी केली. तर जडेजाने 112 धावा केल्या. डेब्यूटंट सरफराज खान याने 62 आणि ध्रुव जुरेल याने 46 धावांचं योगदान दिलं. दरम्यान आता टीम इंडियाचा चौथ्या दिवशी आणखी धावा करुन इंग्लंडसमोर डोंगराएवढं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
End of a magnificent day with the bat & ball! 🙌#TeamIndia reach 196/2, with a lead of 322 runs
Scorecard ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/y30QqTGtk4
— BCCI (@BCCI) February 17, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.