Sarfaraz Khan | सरफराज खानचं पदार्पणातच खणखणीत अर्धशतक, इंग्लंड विरुद्ध जोरदार सुरुवात
Sarfaraz Khan Fifty In Test Debut | सरफराज खान याने आपल्या कसोटी कारकीर्दीची दणक्यात सुरुवा केली आहे. सरफराजने इंग्लंड विरुद्ध पदार्पणात अर्धशतक झळकावलं आहे.
राजकोट | मुंबईकर सरफराज खान याने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात जोरदार सुरुवात केली आहे. सरफराज खान याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं. सरफराजने आपल्या पहिल्याच खेळीत खणखणीत अर्धशतकी खेळी केली आहे. सरफराज खान याच्या फिफ्टीनंतर स्टेडियममध्ये उपस्थित त्याचे वडील नौशाद खान यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. तसेच कॅप्टन रोहित शर्मासह इतर सहकाऱ्यांनीही सरफराजचं अभिनंदन केलं. प्रत्येक खेळाडूचं आपल्या पदार्पणात धमाकेदार कामगिरी करण्याची इच्छा असते. आपल्याला कायम ती खेळी लक्षात रहावी, असं प्रत्येक खेळाडूला वाटतं. मात्र त्यात प्रत्येक खेळाडू यशस्वी होतोच असं नाही. मात्र सरफराज खान याने आपण काय पट्टीचे फलंदाज आहोत, हे आपल्या अर्धशतकी खेळीने दाखवून दिलंय.
सरफराजने आपली पहिली फिफ्टी ही अवघ्या 48 बॉलमध्ये पूर्ण केली. सरफराजने या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावलं. सरफराजने 104.17 च्या वनडे स्ट्राईक रेटनुसार हे अर्धशतक पूर्ण केलं. सरफराजने अर्धशतकादरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली. सरफराजने संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. सरफराजकडून अशाच आक्रमक खेळीची अपेक्षा होती, त्यानुसार त्याने ही खेळी केली.
सरफराज 311 वा भारतीय
दरम्यान सरफराज टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 311 वा भारतीय ठरला. सरफराजला सामन्याआधी टीम इंडियाचे दिग्गज अनिल कुंबळे यांनी कॅप दिली. यावेळेस सरफराजचं त्याच्या सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं. तसेच सरफराजसह ध्रुव जुरेल यानेही डेब्यू केलं.
सरफराज खान याचं पदार्पणात अर्धशतक
In No Time!
5⃣0⃣ on Test debut for Sarfaraz Khan 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/F5yTN44efL
— BCCI (@BCCI) February 15, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.