IND vs ENG 3rd Test Toss | टीम इंडियाने टॉस जिंकला, इंग्लंड विरुद्ध 4 बदल, दोघांचं पदार्पण
India vs England 3rd Test Toss Update | इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
राजकोट | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियात एकूण 4 बदल करण्यात आले आहेत. तर दोघांना पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर इंग्लंडने एकमेव बदल केला आहे.
टीम इंडियात 4 बदल
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 4 बदल करण्यात आले आहेत. दुखापतीनंतर रवींद्र जडेजा याची एन्ट्री झाली आहे. तर मोहम्मद सिराज याचं कमबॅक झालं आहे. तर ध्रुव जुरेल आणि सरफराज खान या दोघांनी पदार्पण केलं आहे. तर अक्षर पटेल आणि केएस भरत या दोघांना बाहेर बसवण्यात आलं आहे. तर इंग्लंडने शोएब बशीर याच्या जागी मार्क वूड याचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडने सामन्याच्या एकदिवसआधीच प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली होती.
कोण घेणार आघाडी?
सध्या 5 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. इंग्लंडने हैदराबादमधील पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली. तर त्यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये इंग्लंडवर मात करत हिशोब बरोबर केला. त्यानंतर आता तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांचा मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता तिसरा सामना कोणती टीम जिंकते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
सरफराज आणि ध्रुवचं पदार्पण
🚨 Team Update 🚨
4⃣ changes in #TeamIndia‘s Playing XI for Rajkot
Dhruv Jurel and Sarfaraz Khan are all set to make their Test Debuts 🙌
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rk1o1dNQMc
— BCCI (@BCCI) February 15, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.