IND vs ENG : दुसऱ्या दिवसअखेर रोहित शर्माने केलेली एक चूक महागात पडणार,आतापर्यंत 17 वेळा असंच घडलं
भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. बेझबॉल रणनितीपुढे भारतीय गोलंदाज पुरते हतबल दिसून आले. दिवसअखेर इंग्लंडने 2 गडी बाद 207 धावा केल्या. त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर पुढचं गणित ठरणार आहे. पण दुसऱ्या दिवसाच्या शेवटी रोहित शर्माने केलेली एक चूक चांगलीच महागात पडणार आहे.
मुंबई : तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची बेझबॉल रणनिती चांगलीच गाजली. इंग्लंडच्या फलंदाजांनी टेस्ट क्रिकेटचं अक्षरश: टी20 क्रिकेट केल्याचं दिसून आलं. भारताने सर्वबाद 445 धावा केल्या आहेत. त्या बदल्यात दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 2 गडी अर्ध लक्ष्य गाठलं. त्यामुळे पुढचा सामना कुठे कसं वळण घेईल सांगता येत नाही. इंग्लंडने 35 षटकात 2 गडी बाद 207 धावा केल्या. यामुळे वनडे क्रिकेटसारखं रनरेट दिसून आला. अजूनही इंग्लंडकडे 238 धावांची आघाडी आहे. तर बेन डकेट 118 चेंडूचा सामना करत नाबाद 133 धावांवर खेळत आहे. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकले. तर जो रुटनेही 13 चेंडूंचा सामना व्यवस्थितरित्या केला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी आरामात 300 धावांचा पल्ला ओलांडेल असंच चित्र आहे. असं असताना दुसऱ्या दिवसाच्या शेवटी कर्णधार रोहित शर्मा याने नको तीच चूक केली. त्याचा फटका उर्वरित तीन दिवसात सोसावा लागू शकतो.
दुसऱ्या दिवसाचं शेवटचं षटक कर्णधार रोहित शर्मा याने आर अश्विन याच्याकडे सोपवलं. अश्विनसमोर शतकवीर बेन डकेट फलंदाजी करत होता. अश्विनने फिरकीच्या जाळ्यात ओढणारा चेंडू टाकला आणि विकेटच्या मागे रोहित शर्मा उडी घेत चेंडू पकडला. यामुळे झेल पकडल्याचा जोरदार अपील करण्यात आला. पण पंचानी नाबाद असल्याचं सांगताच रोहितने झोपलेल्या स्थितीत डीआरएस घेतला. तिसऱ्या पंचांनी रिप्ले बघितल्यानंतर कळलं की बॉल काही बॅटला लागलेला नाही. तसेच एलबीडब्ल्यू पाहता चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडल्याचं दिसलं. त्यामुळे डीआरएस वाया गेला.
https://t.co/lsOPA901Pf #DRS lene ka tarika thoda Casual hai😆😆#INDvsENG #RohitSharma #Bazball #DhruvJurel#TestCricket #RohitSharma𓃵 #indvsengtest pic.twitter.com/mrtNcf47qw
— IPL LATEST NEWS (@newsipl23) February 16, 2024
Rohit Sharma takes DRS from lying on the ground 💀 Rohit be like – Drs Lelo me Aram kar leta hu 😂Rohit Swag😉 pic.twitter.com/BiBmRA7EXQ
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵🥂 (@rushiii_12) February 16, 2024
रोहित शर्माने यापूर्वीही एक डीआरएस घेतला होता आणि तो वाया गेला. एका डावात टीमला 3 डीआरएस मिळतात. म्हणजेच भारताकडे आता फक्त एक रिव्ह्यू बाकी आहे. त्यामुळे इंग्लंडचे 8 विकेट बाकी असताना दोन रिव्ह्यू गमवणं महागात पडेल. जेव्हा खरंच आऊट असेल तेव्हा भारताच्या पदरी काहीच नसेल. भारताने या मालिकेत 24 वेळा डीआरएश वापरला आहे. त्यात 17 वेळा फोल ठरला आहे. जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा फक्त कर्णधार डीआरएससाठी आवाज उचलू शकतो. तर फलंदाजीवेळी फलंदाजांना हा हक्क असतो. इंग्लंडकडे अजूनही 3 डीआरएस शिल्लक आहेत.