Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, 4th T20 : चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, टीम इंडियाच्या प्लेइंग 11 असा बदल

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी20 सामना पुण्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. इंग्लंडने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ 11 वेळा तर आव्हानांचा पाठलाग करताना 3 सामन्यात विजय मिळवला आहे.

IND vs ENG, 4th T20 : चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, टीम इंडियाच्या प्लेइंग 11 असा बदल
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 6:40 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून 2-1 अशी स्थिती आहे. भारताने हा सामना जिंकल्यास मालिका खिशात घालेल. पण इंग्लंडने हा सामना जिंकल्यास पाचव्या सामन्याचं महत्त्व वाढणार आहे. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या तीन सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. दव फॅक्टर लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जात होता. पण राजकोटमध्ये हा निर्णय उलटा झाला. त्यामुळे आता नाणेफेक जिंकून सूर्यकुमार यादव काय घेतो याकडे लक्ष होतं. पण नाणेफेकीचा कौल जोस बटलरच्या बाजूने लागला आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने सांगितलं की, ‘आज आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आधीच छान वातावरण वाटतंय, मालिका छान झाली आहे. त्या कामगिरीमुळे खूप आनंदी आहोत, आमच्याकडे सुधारण्यासाठी क्षेत्रे आहेत पण विजय मिळवून आनंद झाला आहे. दवशी फॅक्टर असेल की नाही याबाबत खात्री नाही. आमच्याकडे संघात दोन बदल आहेत – वुडसाठी महमूद, स्मिथसाठी बेथेल संघात आला आहे.’

दुसरीकडे, टीम इंडियात तीन बदल करण्यात आले आहेत. अर्शदीप सिंग, शिवम दुबे आणि रिंकु सिंह यांना संघात स्थान मिळालं आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘इथे येऊन चांगल्या ब्रँडचे क्रिकेट खेळायचे आहे. मूलभूत गोष्टींना चिकटून राहा, असा सल्ला दिला आहे. आम्ही तो पराभव खेळ राजकोटमध्ये सोडला आहे. आशा आहे की आम्ही या गर्दीसाठी एक मनोरंजक कार्यक्रम करू. शमीच्या जागी अर्शदीप आला आहे, रिंकू जुरेलसाठी आला आहे आणि शिवम दुबे वॉशिंग्टन सुंदरसाठी संघात आला आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद

'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल.
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज.
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम.
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या.
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल.
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?.
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन.
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी.
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार.