Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG T20 : भारताचं इंग्लंडसमोर 182 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या षटकापासून टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं. निर्धाव षटक आणि तीन गडी गमावले आणि टीम इंडियाची स्थिती नाजूक झाली. भारताने 20 षटकात गडी गमवून धावा केल्या आणि विजयासाठी धावांचं आव्हान दिलं आहे.

IND vs ENG T20 : भारताचं इंग्लंडसमोर 182 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 8:45 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी20 सामना सुरु आहे. भारताने या सामन्यात 9 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावा दिल्या आहेत.  या सामन्यात इंग्लंड संघाने चांगली कामगिरी केली. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर इंग्लंड संघावर दबाव होता. मात्र तिसर्‍या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं. त्यानंतर चौथ्या सामन्यात टीम इंडिया फलंदाजीत चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. मात्र या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली. या सामन्यात आघाडीचे फलंदाज सपशेल फेल गेले. पहिल्या षटकात भारताने बिन बाद 12 धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या षटकात ही स्थिती 3 गडी बाद 12 झाली. म्हणजेच या षटकात एकही धाव आली नाही आणि तीन विकेट गमावल्या. भारताने टी20 फॉर्मेटमध्ये पहिल्याच दुसरं षटक निर्धाव टाकत तीन विकेट गमावल्या. त्यानंतर रिंकु सिंह आणि अभिषेक शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांना काही यश आलं नाही. अभिषेक शर्मा 29, तर रिंकु सिंह 30 धावा करून बाद झाले. 79 धावांवर पाच विकेट अशी स्थिती होती. पण शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली.

हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्येवर पोहोचवलं. हार्दिक पांड्याने 27 चेंडूत 50 धावा केल्या. मधल्या फळीत इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.  हार्दिक पांड्या 30 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या बाद झाला तेव्हा भारताने 18 षटकात 166 धावांपर्यंत मजल मारली होती.  हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी 48 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली.  हार्दिक बाद झाल्यानंतर शिवम दुबेने आपली खेळी सुरुच ठेवली. 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद

खंडसेंच्या नातीची छेड काढणारे विशिष्ट पक्षाचे; मुख्यमंत्र्यांची माहिती
खंडसेंच्या नातीची छेड काढणारे विशिष्ट पक्षाचे; मुख्यमंत्र्यांची माहिती.
मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मोठी अपडेट आली समोर
मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मोठी अपडेट आली समोर.
टावळखोरांनी काढली नातीची छेड; आजोबा एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप
टावळखोरांनी काढली नातीची छेड; आजोबा एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप.
मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड; महिला आयोगाने घेतली दखल
मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड; महिला आयोगाने घेतली दखल.
उद्या 100 टक्के अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार: करुणा शर्मा
उद्या 100 टक्के अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार: करुणा शर्मा.
3-3-2025 ला राजीनामा होणार, करुणा शर्मांची खळबळजनक पोस्ट
3-3-2025 ला राजीनामा होणार, करुणा शर्मांची खळबळजनक पोस्ट.
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल.
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज.
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम.
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....