Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG T20 : भारताने चौथा सामना जिंकून मालिका घातली खिशात, 12 व्या खेळाडूमुळे जिंकला सामना

इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने चौथ्या सामन्यातील विजयानंतर खिशात घातली. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं. पण भारताने चौथा सामना 12 व्या खेळाडूच्या जोरावर जिंकला.

IND vs ENG T20 : भारताने चौथा सामना जिंकून मालिका घातली खिशात, 12 व्या खेळाडूमुळे जिंकला सामना
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 10:39 PM

भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-1 ने जिंकली आहे. भारताने या सामन्यात 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावा दिल्या. पण इंग्लंडचा संघ 19.4 षटकात सर्व गडी गमवून 166 धावा करू शकला. भारताने हा सामना 15 धावांनी जिंकला. 2012 पासून इंग्लंडने भारताविरुद्ध एकही टी20 मालिका जिंकलेली नाही. या सामन्यात भारताचं स्थिती खरं तर नाजूक होती. पण हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेच्या खेळीमुळे भारताने 181 धावापर्यंत मजल मारली आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान खरं तर खडतर होतं. पण इंग्लंडने पॉवर प्लेमध्ये जबरदस्त सुरुवात केली. बेन डकेट आणि फिलिप सॉल्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडण्यात रवि विष्णोईला यश आलं. त्यानंतर अक्षर पटेलनेही कमाल करत विकेट घेतली. तीन विकेट मिळूनही सामना भारताच्या हातून निसटतो की काय अशी स्थिती होती. पण भारताने कन्सक्शन सब्सिट्यूट म्हणून हार्षित राणाला घेतलं. दुखापतग्रस्त शिवम दुबेचा बदली खेळाडू म्हणून त्याला संधी मिळाली. त्याचा पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना होता. तोही कन्सक्शन सब्सिट्यूट म्हणून… त्याने या संधीचं सोनं केलं आणि भारताला चौथी विकेट मिळवून दिली. त्याने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लियाम लिविंगस्टोनची महत्त्वपूर्ण विकेट काढली आणि येथून सामना फिरला. पुन्हा एकदा हा सामना भारताच्या पारड्यात पडला.

हार्षित राणा इतक्यावरच थांबला नाही त्याने जेकब बेथलेची विकेट काढली आणि सामना भारताच्या बाजूने पूर्णपणे झुकला. हार्षित राणाने 4 षटकात 33 धावा देत तीन गडी बाद केले. खरं तर हार्षित राणाने इंग्लंडचं कंबरडं मोडलं. त्यामुळे भारताचा विजय आणखी सोपा झाला.  19 व्या षटकात त्याने फक्त 6 धावा देत ही ओवर्टनची विकेट काढली. त्यामुळे 6 चेंडू आणि 19 अशी स्थिती आली. शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने फक्त तीन धावा देत विकेट घेतली आणि भारताना हा सामना 15 धावांनी जिंकला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद

सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा.
संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो
संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो.
वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार
वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार.
मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी..
मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी...
शिंदेच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; कार्यकर्ते आक्रमक
शिंदेच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; कार्यकर्ते आक्रमक.
एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमणार; माधुरी मिसाळ यांचा निर्णय
एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमणार; माधुरी मिसाळ यांचा निर्णय.
मंत्री रक्षा खडसे आणि आरोपी मोरेची ऑडिओ क्लिप व्हायरल
मंत्री रक्षा खडसे आणि आरोपी मोरेची ऑडिओ क्लिप व्हायरल.
पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय
पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय.
धक्कादायक! आधी चाकूचा धाक दाखवून बलात्कार, नंतर दागिने अन् घर लुटलं
धक्कादायक! आधी चाकूचा धाक दाखवून बलात्कार, नंतर दागिने अन् घर लुटलं.
कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा; देशमुख कुटुंबाची मागणी
कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा; देशमुख कुटुंबाची मागणी.