IND vs ENG : टीम इंडियाच्या गोलंदाजाला शतकाची संधी, चौथ्या सामन्यात धमाका करण्यासाठी सज्ज
Indian Cricket Team : टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाच्या खेळाडला चौथ्या टी 20i सामन्यात खास शतक करण्याची संधी आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20I मालिकेतील चौथा आणि निर्णायक सामना हा 31 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाला शतक करण्याची संधी आहे. टीम इंडियासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अर्शदीप सिंह याला शतक करण्याची संधी आहे. मात्र हे शतक धावांचं नाही, तर विकेट्सचं आहे. अर्शदीपने अशी कामगिरी केल्याल त्याचा प्रमुख गोलंदाजांच्या यादीच समावेश होईल.
अर्शदीप सिंह याने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी 20I सामन्यात युझवेंद्र चहल याला मागे टाकत टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. आता अर्शदीपच्या नावावर 98 विकेट्सची नोंद आहे. अर्शदीपला राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या टी 20I सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आता अर्शदीप पुण्यातील सामन्यात 2 विकेट्स घेताच इतिहास घडवेल. अर्शदीप टीम इंडियाकडून 100 टी 20I विकेट्स घेणारा पहिला तर एकूण 21 वा गोलंदाज ठरेल.
अर्शदीपची टी 20I कारकीर्द
अर्शदीपने टीम इंडियाचं 8 एकदिवसीय अणि 62 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. अर्शदीपने वनडेत 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी 20I मध्ये 98 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच अर्शदीपने आयपीएलमध्ये 76 विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडियासाठी टी 20i मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- अर्शदीप सिंह : 98 विकेट्स
- युझवेंद्र चहल : 96 विकेट्स
- हार्दिक पंड्या : 96 विकेट्स
- भुवनेश्वर कुमार : 90 विकेट्स
- जसप्रीत बुमराह : 89 विकेट्स
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.