Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 4th T20: टीम इंडियाचा वाघ परतला;चौथ्या सामन्याआधी ताकद दुप्पट! कुणाचा पत्ता कट?

India vs England 4th T20i : टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 31 जानेवारीला चौथा सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा वाघ दुखापतीतून सावरला असून कमबॅकसाठी सज्ज झाला आहे.

IND vs ENG 4th T20: टीम इंडियाचा वाघ परतला;चौथ्या सामन्याआधी ताकद दुप्पट! कुणाचा पत्ता कट?
team india hardik nitish suryakumar rinkuImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 9:54 AM

टीम इंडियाच्या खेळाडूंमागे सध्या दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी आणि इतर खेळांडूंना दुखापत झाली आहे. काही खेळाडूंची दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत निवड करण्यात आलेली नाही. अशात टीम इंडियाच्या गोटातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू दुखापतीतून सावरला असून इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा टी 20i सामना हा 31 जानेवारीला पुण्यात खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडियाचा ग्रेट फिनिशर रिंकु सिंह दुखापतीतून सावरला आहे. रिंकु दुखापतीतून सावरल्यानंतर आता चौथ्या सामन्यात खेळण्यासाठी फिट आहे. चौथ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेनडेशकाटे यांनी ही माहिती दिली.

टीम इंडियाने चौथ्या टी 20i सामन्याआधी 2 दिवस सराव केला. रिंकूने बुधवारी बॅटिंग केली आणि तो पूर्णपणे फिट आहे. रिंकु मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, अशी माहिती रायन टेनडेशकाटे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

रिंकु या मालिकेतील सलामीच्या सामन्यात खेळला. मात्र रिंकूला दुसऱ्या सामन्याआधी पाठदुखीचा त्रास जाणवला. रिंकूला त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20i सामन्याला मुकावं लागंल. तसेच टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवल्याने रिंकूला बॅटिंगची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता रिंकूची बॅटिंग पाहण्यासाठी क्रिकेट चाहचे उत्सूतक आहेत.

कुणाचा पत्ता कट?

दरम्यान रिंकूच्या कमबॅकनंतर प्लेइंग ईलेव्हनमधून विकेटकीपर बॅट्समन ध्रुव जुरेल याचा पत्ता कट होईल. रिंकूच्या अनुपस्थितीत ध्रुवला गेल्या 2 सामन्यात संधी मिळाली होती. मात्र ध्रुवला काही खास करता आलं नाही.

टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं.
पुणे अत्याचार प्रकरणात एकनाथ शिंदेंची मोठी माहिती, म्हणाले..
पुणे अत्याचार प्रकरणात एकनाथ शिंदेंची मोठी माहिती, म्हणाले...
स्वारगेट प्रकरणातील आरोपीनं माजी आमदाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वारगेट प्रकरणातील आरोपीनं माजी आमदाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मराठी भाषेची दैना थांबेना! एमए-मराठी करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही
मराठी भाषेची दैना थांबेना! एमए-मराठी करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही.
स्वारगेटमध्ये बलात्कार, आता 30 हजारांची चोरी, थेट कंडक्टरचे पैसे लंपास
स्वारगेटमध्ये बलात्कार, आता 30 हजारांची चोरी, थेट कंडक्टरचे पैसे लंपास.
पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या मागावर; मंत्री योगेश कदम यांची माहिती
पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या मागावर; मंत्री योगेश कदम यांची माहिती.
पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, थेट...
पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, थेट....
कॅब चालकाने केले अश्लील चाळे, तरुणीने चालत्या कॅबमधून घेतली उडी ..
कॅब चालकाने केले अश्लील चाळे, तरुणीने चालत्या कॅबमधून घेतली उडी ...
लग्नाच्या वरातीत महिलांचा अश्लील डान्स, लग्न राहिलं बाजूला भलतंच घडलं
लग्नाच्या वरातीत महिलांचा अश्लील डान्स, लग्न राहिलं बाजूला भलतंच घडलं.