मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे. रांचीमध्ये पार पडलेल्या चौथ्या कसोटी मालिकेतही रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली इंग्लिश संघाचा पराभव करत मालिका खिशात घातली. टीम इंडियाने मालिका जिंकत मोठा पराक्रम आहे. सलग १७ मालिकांमध्ये घरच्या मैदानवर विजयश्री कायम ठेवला आहे. ३-१ ने मालिका खिशात घातल्यानंतर टीम इंडियाला गिफ्ट मिळालं आहे.
चौथा कसोटी सामना एक दिवस आधी म्हणजेच चौथ्याच दिवशी जिंकला. आता पुढील पाचवा कसोटी सामना धर्मशाला येथे होणार आहे. हा सामना ७ मार्च ते ११ मार्च यादरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला सुट्टी देण्याती आल्याची माहिती समजात आहे. टीम इंडियाचे खेळाडू आपल्या घरी जावू शकणार आहेत. फक्त टीम इंडियालाच नाहीतर इंग्लंडच्या खेळाडूंनाही सुट्टी मिळाल्याची माहिती समजत आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना पाच दिवस ही सुट्टी राहणार आहे.
पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाकडे तयारीसाठी चार दिवस असणार आहेत. या सामन्याआधी खेळाडू आपल्या घरी जावून येऊ शकतात. टीम इंडियाने मोठं शिखर सर केलं आहे असं म्हणावं लागेल. इंग्लंड संघ पाकिस्तामध्ये पाहुणा म्हणून गेला होता तेव्हा त्यांनी यजमान पाकिस्तान संघाला व्हाईटवॉश दिला होता. त्यामुळे यंदा भारतामध्ये आल्यावर आपल्या बेजबॉल रणनितीने धक्कादायक निकाल नोंदवतात की काय अशी भीती होती.
दरम्यान, टीम इंडियाने बेजबॉलमधील हवा सोडलेली संपूर्ण क्रिकेट जगताने पाहिली. महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली, के.एल. राहुल, जडेजा हे खेळाडू सर्व सामने खेळले नाहीत. तरीसुद्धा टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल आणि आकाशदीप यांनी चमकदार कामगिरी केली आहे. आता पाचव्या कसोटीतही विजयी पताका लावण्यासाठी टीम इंडिया आपली संपूर्ण ताकद लावताना दिसेल.