IND vs ENG | ध्रुव-कुलदीपची ‘यशस्वी’ झुंज, शोएबचा पंजा, इंग्लंडला फक्त 46 धावांची आघाडी
India vs England 4th Test | ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव या दोघांनी केलेल्या चिवट भागीदारीच्या जोरावर भारताला 300 पार मजल मारता आली. तर इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली आहे.
रांची | ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव या दोघांनी केलेली चिवट भागीदारी आणि यशस्वी जयस्वालच्या 73 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने इंग्लंडच्या 353 धावांच्या प्रत्युत्तरात 103.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 307 धावा केल्या. इंग्लंडच्या युवा शोएब बशीर याने घेतलेल्या 5 विकेट्समुळे इंग्लंडला 46 धावांची तुटपूंजी आघाडी मिळाली. आता भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडला झटपट गुंडाळण्याचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाकडून ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर कुलदीप यादव याने उल्लेखनीय कामगिरी केली.
टीम इंडियाकडून ध्रुव जुरेलयाने 149 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल याने 117 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 8 फोर मारले. शुबमन गिल याने 65 बॉलमध्ये 38 आणि कुलदीप यादव याने 28 धावांची झुंजार खेळी केली. तर इतरांनी घोर निराशा केली. रजत पाटीदार 17, रवींद्र जडेदा 12 आणि सरफराज खान याने 14 धावा केल्या. तर कॅर्टन रोहित शर्मा 2 धावा करुन आऊट झाला.
शोएब बशीर याचा पंजा
इंग्लंडकडून 20 वर्षीय युवा शोएब बशीर याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. शोएबच्या कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. शोएबने यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल या 5 जणांना आऊट केलं. टॉम हार्टले याने 3 विकेट्स घेतल्या. तर जेम्स एंडरसन याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
दरम्यान टीम इंडियाचा पहिला डाव आटोपल्यानंतर लंच ब्रेक झाला आहे. आता इंग्लंड दुसऱ्या डावाची सुरुवात 46 धावांच्या आघाडीने करणार आहे. आता इंग्लंड टीम इंडियासमोर दुसऱ्या डावात कशी बॅटिंग करते,याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला
It’s Lunch on Day 3 of the Ranchi Test!
A narrow miss on a maiden Test ton but what a gutsy 90 from Dhurv Jurel! 👍 👍#TeamIndia added 88 runs to their overnight score to post 307 on the board.
Second Session coming up shortly.
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9… pic.twitter.com/NTJauz0Y8G
— BCCI (@BCCI) February 25, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.