Joe Root चा ‘रन’वास संपला, 13 डावानंतर टीम इंडिया विरुद्ध अर्धशतक

Joe Root Fifty | इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याला गेल्या अनेक सामन्यांपासून धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र अखेर जोला कमबॅकचा 'रुट' सापडला.

Joe Root चा 'रन'वास संपला, 13 डावानंतर टीम इंडिया विरुद्ध अर्धशतक
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 2:27 PM

रांची | इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुट याला अखेर टीम इंडिया विरुद्ध सूर गवसला आहे. जो रुट याचा अखेर 13 डावांनंतर धावांचा वनवास संपला आहे. जो रुटने भारतात टीम इंडिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल डावांच्या प्रतिक्षेनंतर अर्धशतक झळकावलं आहे. रुटने रांचीत सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात 108 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने आणि 46.30 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 61 वं अर्धशतक ठरलं.

लंचनंतर डाव सावरला

टीम इंडियाने पहिल्या सत्राच्या शेवटच्या बॉलवर कॅप्टन बेन स्टोक्स याला आऊट केलं. त्यामुळे इंग्लंडने 5 विकेट्स गमावल्या. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 24.1 ओव्हरमध्ये 5 बाद 112 अशी झाली. मात्र त्यानंतर विकेटकीपर बेन फोक्स आणि जो रुट या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी 1-1 धाव जोडून इंग्लंडचा धावफक हलता ठेवला. या दरम्यान जो रुट इंग्लंडला खरी गरज असताना मैदानात टिकून राहिला आणि अर्धशतक पूर्ण केलं.

दुसरं सत्र इंग्लंडच्या नावावर

दरम्यान इंग्लंडच्या बेन फोक्स आणि जो रुट या जोडीने दुसऱ्या सत्रापर्यंत सहाव्या विकेटसाठी नाबाद 86 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने यासह दुसरं सत्र आपल्या नावावर केलं. इंग्लंडची या मालिकेत कोणत्याही एका सत्रात विकेट न गमावण्याची पहिली वेळ ठरली. बेन फोक्स हा 108 बॉलमध्ये 28 आणि जो रुट 154 बॉलमध्ये 67 धावा करुन नाबाद आहे. आता तिसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर ही जोडी फोडण्याचं आव्हान असणार आहे.

जो रुटची चिवट खेळी

जो रुटचं भारतात 13 डावांनंतर अर्धशतक

दरम्यान जो रुटने भारतात 2021 नंतर आणि 13 डावानंतर अर्धशतक केलं आहे. रुटने टीम इंडिया विरुद्ध भारतात गेल्या 13 डावात अनुक्रमे 218,40,6,33,17,19,5,30,29,2,5,16,18 आणि 7 धावा केल्या आहेत.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.