IND vs ENG | इंग्लंडसाठी चौथा सामन्यात ‘करो या मरो’, इंडियाला मालिका विजयाची संधी
India vs England 4th Test | इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी आता 12 तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे.
रांची | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथी कसोटी ही 23 फेब्रुवारीपासून रांचीत खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवातह होणार आहे. तर 9 वाजता टॉस होईल. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंड क्रिकेट टीमची धुरा असणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे.
इंग्लंडसाठी करो या मरो
इंग्लंड टीमने पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाने इंग्लंडला सलग दोन्ही सामन्यात पराभवाची धुळ चारत कमबॅक केलं. टीम इंडियाने 0-1 वरुन 2-1 अशी आघाडी घेतली. आता चौथा सामना जिंकल्यास टीम इंडिया मालिका जिंकेल. पण इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल, तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत सामना किमान ड्रॉ किंवा जिंकावा लागेल. त्यामुळे इंग्लंडचा या चौथ्या कसोटी सामन्यात मोठा कस लागणार आहे.
प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल
इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी 24 तासआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. मार्क वूड आणि रेहान अहमद या दोघांना डच्चू देण्यात आला आहे. तर ओली रॉबिन्सन आणि शोएब बशीर या दोघांना स्थान देण्यात आलं आहे.
टीम इंडियाची रांचीमधील आकडेवारी
दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत रांचीतील या स्टेडियममध्ये एकूण 2 सामने खेळले आहेत. त्यापैकी 1 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे. टीम इंडियाने या स्टेडियममध्ये आपला पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा सामना अनिर्णित राहिला होता. तर त्यानंतर 2 वर्षांनी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं.
कॅप्टन बेन स्टोक्सचा बॉलिंगचा सराव
https://t.co/0lvhs69C4H pic.twitter.com/5YkZy2Illq
— England Cricket (@englandcricket) February 22, 2024
टीम इंडिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप