Rajat Patidar : सलग दुसऱ्यांदा डक, नेटकऱ्यांकडून टीका, रजत पाटीदारचा क्रिकेटला रामराम?
Rajat Patidar Team India | रजत पाटीदार याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं. मात्र रजत या मालिकेत आतापर्यंत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रजत अवघ्या 6 डावांपैकी 2 डावांमध्ये सलग झिरोवर आऊट झाला.
रांची | टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकत 5 सामन्यांची मालिका 3-1 ने लॉक केली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 192 धावांचं आव्हान हे टीम इंडियाने चौथ्या दिवशी 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी निर्णायक खेळी केली. यशस्वीने 37 धावांची भर घातली. तर ध्रुव 39 रन्सवर नॉट आऊट राहिला.
ध्रुव जुरेल याने टीम इंडियसाठी पहिल्या डावात 90 धावांची खेळी करत डाव सावरला. ध्रुवने आपल्या दुसऱ्याच सामन्यात छाप सोडली. तर दुसऱ्या बाजूला रजत पाटीदार हा चांगलाच अपयशी ठरला. रजत इंग्लंड विरुद्ध सलग दुसऱ्यांदा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. रजतला विराट कोहली याच्या जागी टीममध्ये संधी देण्यात आली. रजतने दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं. तेव्हापासून ते आतापर्यंत फार काही खास केलेलं नाही. रजतने पदार्पणापासून ते आतापर्यंत 32,9,5,0,17 आणि 0 अशा धावा केल्या आहेत. तसेच रजत चौथ्या सामन्यातील चौथ्या डावात टीम इंडियाला अडचणीत असताना आऊट झाला. त्यामुळे नेटकऱ्यांचा पार आणखी चढला. नेटकऱ्यांनी रजतला थेट निवृत्तच करुन टाकला.
नेटकऱ्यांकडून रजतचे आभार
Thank you patidar pic.twitter.com/A3pdTvAwtS
— frosty_11 (@redball2004) February 26, 2024
नेटकऱ्यांनी रजतच्या कामगिरीवर संतापत त्याने आतापर्यंत केलेल्या कामगिरीसाठी त्याचे आभार मानले. त्याने आता निवृत्ती घ्यावी, असंही काही नेटकऱ्यांच मत आहे. काहींनी तर हद्दच केली. सचिन तेंडुलकरच्या कसोटी निवृत्तीचा फोटो एडीट करुन त्याच्या जागी रजतचा चेहरा जोडलाय. तर सरफराज खान त्याला खांद्यावर घेऊन मैदानात फिरवत असल्याचा फेक फोटो व्हायरल केलाय.
रजत पाटीदारला नेटकऱ्यांकडून निरोप
Thank you for your services Rajat Patidar,You will not be missed🤕💔#Rajatpatidar #INDvENG pic.twitter.com/3SfLz2dech
— Keshav Singh Bhadoriya (@KeshavSinghBh11) February 26, 2024
या एडीटेड फोटोमुळे रजतने खरचं निवृत्ती घेतली की काय, अशी प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला. मात्र असं काही नाही. नेटऱ्यांनी नेहमीप्रमाणे फ्लॉप कामगिरी करणाऱ्या खेळाडूची सोशल मीडियावरुन वरात काढत जाहीर सत्कार केला आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.