IND vs ENG | रोहित शर्मा इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीत विकेटकीपिंग करणार! फोटो व्हायरल
India vs England 4th Test | टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे.
रांची | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या रांचीत होणार आहे. या सामन्याला 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे.
टीम इंडियाने मालिका विजयासाठी नेट्समध्ये जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. खेळाडूंचे नेट्समध्ये सरावाचे फोटो व्हायरल झाले आहेत. एक असाच सरावाच फोटो व्हायरल झाल्याने भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का लागला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा चौथ्या कसोटीत विकेटकीपिंग करणार असल्याची चर्चा या फोटोमुळे रंगली आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हायरल फोटोमध्ये कॅप्टन रोहित शर्मा, शुबमन गिल, ऑलराउंडर अक्षर पटेल आणि विकेटकीपर ध्रुव जुरेल दिसत आहेत. रोहित शर्मा या फोटोत स्टंपच्या मागे बॉल कलेक्ट करताना दिसतोय. त्यामुळे काही उत्साही क्रिकेट चाहत्यांनी रोहित शर्मा चौथ्या कसोटी सामन्यात विकेटकीपिंग करणार असल्याचा अंदाज बांधला. मात्र तसं काही नाही.
जसप्रीत बुमराहला विश्रांती
दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून टीम इंडियाचा उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात मुकेश कुमार आणि आकाश दीप या दोघांपैकी एकाला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. आकाश दीपला संधी मिळाल्यास त्याचं पदार्पण होईल.
रोहितच्या या फोटोमुळे चाहत्यांमध्ये गोंधळ
Captain is getting ready to seal the Test series at Ranchi. 🇮🇳 pic.twitter.com/T0j9fKUuzl
— Johns. (@CricCrazyJohns) February 21, 2024
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप